आयडीएफने आपल्या अधिकृत हँडलवर ठार झालेल्या हमास प्रमुख याह्या सिनवारचे फुटेज जारी केले आहे. ६ ऑक्टोबर रोजीची हे व्हिडीओ फुटेज आहेत. व्हिडीओमध्ये सिनवार त्याच्या पत्नी आणि मुलांसह एका भूमिगत बोगद्यातून चालताना दिसत आहे. विशेष म्हणजे, यामध्ये सिनवार याच्या बायकोकडे एक बॅग दिसली, ज्याची किंमत तब्बल २७ लाख रुपये इतकी आहे.
आयडीएफचे प्रवक्ते नदव शोशानी यांनी हे व्हिडीओ फुटेज शेअर केले आणि लिहिले, ७ ऑक्टोबरच्या हत्याकांडाच्या काही तास आधी सिनवार आपल्या कुटुंबांसह बोगद्यात जाताना दिसत आहे. फुटेजमध्ये सिनवार खाद्यपदार्थ, इतर वस्तू नेतना दिसत आहे, जेणेकरून तो बराच वेळ बोगद्यात राहू शकेल. तसेच व्हिडीओमध्ये सिनवारच्या पत्नीकडे बर्कीन बॅग दिसली. सुमारे $३२,००० (२७ लाख रुपये) किमतीची ही बॅग आहे. आयडीएफचे प्रवक्ते अविचाय अद्रेई यांनी ट्वीटकरत म्हटले, गाझामधील रहिवाशांकडे अन्नासाठी पैसे नाहीत आणि सिनवारच्या पत्नीकडे २७ लाख रुपयांची बॅग आहे. या बॅगच्या किमतीचे फोटोही शेअर केले आहेत.
हे ही वाचा :
हैदराबाद पबमध्ये पोलिसांचा छापा
दिल्लीतील CRPF शाळेजवळ मोठा स्फोट!
नागपुरातील स्फोटके आणि दारूगोळा उत्पादन युनिट सुसाट
संविधानाविषयीच्या गैरसमजुतीत दडली देशापुढील महत्त्वाच्या समस्यांची पाळेमुळे
आयडीएफने गेल्या आठवड्यात सिनवारचे फुटेज प्रसिद्ध केले होते, ज्यात त्याचे शेवटचे क्षण दाखवले गेले होते. या ड्रोन व्हिडिओमध्ये तो एका खुर्चीवर बसलेला, धुळीने झाकलेला, त्याच्या उजव्या हाताला मोठी जखम झालेली दिसत आहे. सिनवार जवळ ड्रोन घिरट्या घालत असताना, ड्रोनवर काठीने हल्ला करण्याचा तो प्रयत्न करताना दिसत आहे. अखेर इस्रायल सैन्याने त्याला ठार केले आणि सिनवारचा मृत्यू झालेला फोटोही जारी केला.
दरम्यान, ओलिसांची सुटका होईपर्यंत इस्रायलच्या लष्करी कारवाया सुरूच राहतील आणि हमासला पुन्हा प्रस्थापित होण्यापासून रोखण्यासाठी गाझामध्ये सैन्य कार्यरत राहतील, असे नेतान्याहू यांनी जाहीर केले आहे.
🎥DECLASSIFIED FOOTAGE:
Sinwar hours before the October 7 massacre: taking down his TV into his tunnel, hiding underneath his civilians, and preparing to watch his terrorists murder, kindap and rape. pic.twitter.com/wTAF9xAPLU
— LTC Nadav Shoshani (@LTC_Shoshani) October 19, 2024