मगील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेल्या यास वादळाबाबत आता पुरेशी स्पष्टता मिळाली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यानंतर आता हा भाग २५ मे पर्यंत अतिशय घातक चक्रीवादळाचे रुप धारण करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर ओडिशा आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या किनारपट्टीच्या जवळ हे वादळ जमिनीवर २६ मेच्या सकाळी पोहोचण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे.
या वादळाचे नाव यास असे देण्यात आले आहे. २६ मेच्या संध्याकाळी हे चक्रीवादळ लँडफॉल करण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. परंतु यावेळी वादळाची तीव्रता नुकत्याच तौक्ते वादळाएवढी नसेल.
हे ही वाचा:
भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु सुशील कुमारला जालंधर येथून अटक
देशाला कोविड पाठोपाठ काळ्या बुरशीची चिंता
२२ मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. २३ मे पर्यंत त्याचे रुपांतर एका डिप्रेशन मध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि हे वादळ पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेश यांच्यामधे कुठेतरी २६ मे पर्यंत पोहोचेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
यास वादळामुळे मच्छिमारांना २३ ते २५ मे समुद्रात न जाण्याची सुचना देण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशील येथील बंगालच्या उपसागरात २४ ते २६ मे मच्छिमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याची सुचना केली गेली आहे. त्याबरोबरच ज्या नौका सध्या समुद्रात आहेत, त्यांना किनाऱ्यावर येण्याचा संदेश देखील पाठवण्यात आला आहे.