आज दुपारी ३ वाजल्यापासून जगज्जेतेपदाचा लढा सुरु

आज दुपारी ३ वाजल्यापासून जगज्जेतेपदाचा लढा सुरु

आज करोडो क्रिकेट रसिकांची प्रतिक्षा संपणार आहे. रोमांच काय असतो, हे क्षणाक्षणाला अनुभवायला मिळणार आहे. कोरोना काळात नियमरुपी बांधलेल्या बेड्या तशाच ठेऊन टीम इंडियाला प्रोत्साहित करण्याची संधी समस्त भारतवासियांना मिळणार आहे. आजपासून पुढचे पाच दिवस क्रिकेटच्या मैदानात जग्गजेतेपदाची ‘कसोटी’ खेळविली जाणार आहे. पावसाने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर सहाव्या दिवशीही टक्कर सुरुच राहिल. कारण महामुकाबला तसा तगडा आहे. साऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाऊलच्या बाल्कनीत जग्गजेतेपदाची गदा उंचावण्यासाठी विराट कोहली आणि केन विल्यमसन दोघेही आसुसलेले आहेत. आज दुपारी ठीक अडीज वाजता विराट आणि केन नाणेफेकीसाठी मैदानात जातील. आतापर्यंतच्या सगळ्यात प्रतिक्षेत असलेली नाणेफेक उडवली जाईल. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्याला ठीक तीन वाजता सुरुवात होईल.

इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन हॅम्पशायर बाऊलच्या क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळविला जाणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी जग्गजेतेपदाच्या सामन्याला  भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक तीन वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक अडीज वाजता सामन्याच्या नाणेफेकीला विराट आणि केन मैदानात जातील.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्सच्या इतर चॅनेलवर पाहू शकता. हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. सुनील गावस्करांच्या साथीला माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकची कॉमेन्ट्री तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.

हे ही वाचा :

कोरोना आकडेवारीत पुन्हा घट

शिवसेनेत ‘राम’ राहिला नाही!

‘शर्मा यांच्यासह काम करणाऱ्या पंटर्सचा मनसुखच्या हत्येत हात’

वाझेला शंभर कोटीचे टार्गेट, प्रदीप शर्माला कितीचे?

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी हे ११ खेळाडू भारतीय संघाने घोषित केले आहेत.

Exit mobile version