वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना निर्णायक वळणावर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना निर्णायक वळणावर

इंग्लंडमध्ये होत असलेल्या पहिल्या वाहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विश्वविजेते होण्यासाठी न्यूझीलंडला १३९ धावांची आवश्यकता आहे. भारतीय संघाचा दुसरा डाव १७० धावांमध्ये गडगल्यानंतर न्यूझीलंड संघासमोर १३९ धावांचे विजयी लक्ष्य ठेवले गेले आहे. सामन्याचा हा अखेरचा दिवस असून आता या स्पर्धेचा कोणी विजेता ठरणार की हा अंतिम सामना अनिर्णित राहणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

अतिशय नाट्यमय घडामोडींनी भरलेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. सामन्याचा अखेरचा म्हणजेच चौथा डाव खेळण्यासाठी न्यूझीलंडचे सलामीचे फलंदाज मैदानात उतरले असून १३९ धावांचे विजयी ध्येय साध्य कारण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर न्यूझीलंड संघाला रोखण्यासाठी भारतीय गोलंदाज प्रयत्नशील आहेत.

हे ही वाचा:

वसई-विरारमधील बांधकाम माफियांना कुणाचा आशीर्वाद?

कृषी विभागात ‘वाझे’कडून कोट्यवधींची वसुली सुरु

तुंबलेल्या नदीतील कचरा काढण्याचा खर्च प्रवाही

परप्रांतीय पुन्हा वळले मुंबईकडे

सामन्याच्या अखेरच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे खेळण्यास्तही मेदात उतरले. पण त्यांना प्रभावी कामगिरी करणे शक्य झाले नाही. न्यूझीलंड संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघाची धूळधाण उडाली. भारतीय संघाचे मधल्या फळीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. कर्णधार विराट कोहलीने १३ धावा केल्या, तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी १५ धावा केल्या.

१३९ धावांचे विजयी लक्ष्य घेऊन खेळण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने चहाच्या ब्रेकपर्यंत ८ षटकांमध्ये नाबाद १९ धावांची खेळी केली आहे. शेवटच्या दिवसाचा अजून ४५ षटकांचा खेळ शिल्लक असून न्यूझीलंडला जिंकण्यासाठी १२० धावांची आवश्यकता आहे. हा सामना अनिर्णित राहिला तर स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम ही दोन्ही संघाना विभागून देण्यात येणार आहे.

Exit mobile version