पीस दरवाजे स्पष्टपणे उभे आहेत…मेट्रो गाडीच्या डब्यात सदोष मराठी

पीस दरवाजे स्पष्टपणे उभे आहेत…मेट्रो गाडीच्या डब्यात सदोष मराठी

मुंबईकरांच्या सेवेत नव्याने दाखल झालेल्या मेट्रो २ ए आणि ७ च्या या मार्गावरील मेट्रोचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. मेट्रो गाड्यांमधील सूचना लिहिताना त्यात अत्यंत गंभीर स्वरूपाच्या चुका आढळून आल्या आहेत. मेट्रो गाडीच्या डब्यात दाखविल्या जाणाऱ्या सूचनांचे मराठीतील भाषांतरही चुकीचे आहे. याबाबत नागरिकांनी समाज माध्यमातून महा मुंबई मेट्रो संचलन मंडळावर (एमएमएमओसीएल) टीका केली आहे.

यापूर्वीही ‘एमएमएमओसीएल’चे संकेत स्थळ मराठीत नसल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. संबंधित विभागाने तक्रार केली असता ‘एमएमएमओसीएल’ चे संकेतस्थळ मराठी भाषेत ही उपलब्ध करून दिले. मात्र मेट्रोत इंग्रजी शब्दांचे  मराठी मध्ये भाषांतर करून दिल्याने समजण्याऐवजी नागरिकांचा गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे.

हे ही वाचा:

“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

…म्हणून काँग्रेसच्या आमदाराने भाजपाच्या उमेदवार मुर्मू यांना केले मतदान!

नवी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होऊन आता पर्यंत तीन- साडेतीन महिने झाले आहेत. अद्यापही मेट्रो सूचना फलकांवर मराठी अक्षराबाबत त्रुटी आढळत आहेत. ‘कृपया दरवाजांपासून दूर उभे रहा’ या आशयाच्या इंग्रजी वाक्यांचे ‘पीस दरवाजे स्पष्टपणे उभे आहेत’ असे चुकीचे मराठीत भाषांतर केलेले आहे. याची चित्रफीत तयार करून समाज माध्यमात प्रसारीत केली आहे. या गोंधळाबाबत ‘एमएमएमओसीएल’ टीकेचे धनी ठरले आहेत.

Exit mobile version