हिंदी साहित्यातील प्रसिद्ध लेखक उदय प्रकाश पुन्हा एकदा चर्चेत आपले आहेत. उदय प्रकाश यांनी राम मंदिराला देणगी दिल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. पण याच कारणासाठी त्यांच्यावर टीकासुद्धा सुरु झाली आहे.
अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभारण्यासाठी सध्या देशभर निधी संकलन अभियान सुरु आहे. या अभियानाला समाजाच्या सर्व स्तरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य माणसापासून ते विविध क्षेत्रातले दिग्गज सढळ हस्ते राम मंदिर उभारणीसाठी आपले योगदान देत आहेत. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक उदय प्रकाश यांनी देखील या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद देत राम मंदिरासाठी देणगी दिली. आपल्या सोशल मीडिया खात्यावरून त्यांनी राम मंदिराला दिलेल्या निधीची पावती प्रसिद्ध केली. पण यामुळे सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली
उदय प्रकाश हे हिंदीतील एक ख्यातनाम लेखक असून त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. २०१५ साली कन्नड लेखक एम. एम. कर्लबुर्गी यांच्या हत्येनंतर उदय प्रकाश यांनी ज्ञानपीठ पुरस्कार परत केला होता. यावेळी त्यांनी देशात असहिष्णुता वाढल्याचे म्हटले होते. या नंतरच देशभरात पुरस्कार वापसीची लाट आली होती.