कुस्तीगीरांचे पुन्हा आंदोलन पण यावेळी कुस्तीगीरांच्याच विरोधात!

जुनियर कुस्तीपटूंचे जंतरमंतर मैदानात आंदोलन

कुस्तीगीरांचे पुन्हा आंदोलन पण यावेळी कुस्तीगीरांच्याच विरोधात!

भारतीय कुस्ती संघटेनबाबत सुरु असलेल्या वादाला बुधवारी नवे वळण पाहायला मिळाले. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्याविरोधात जुनियर कुस्तीपटूंनी आंदोलन सुरु केले आहे.बुधवारी दिल्लीतील जंतरमंतर मैदानात शकडो पैलवान जमले आणि त्यांनी या तिघांचा निषेध करत घोषणाबाजी केल्या.

आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या हातात घोषणा लिहिलेले बॅनर होते.यापैकी एकात लिहिले होते की, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी देशाच्या कुस्ती उद्ध्वस्त करून टाकली आहे.आंदोलन करणारे जुनियर कुस्तीपटू युपी, हरियाना आणि दिल्ली येथून आले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, आंदोलन कर्त्यांच्या निदर्शनाबाबत कोणतीही पूर्व माहिती न्हवती.या आंदोलनात बागपतच्या छपरौली येथील ३०० जुनियर कुस्तीपटूंचा समावेश आहे.याशिवाय नरेलाच्या वीरेंद्र रेसलिंग अकादमीमधून काही कुस्तीपटू आले आहेत.एवढेच नाहीतर आता आणखी काही पैलवान या ठिकाणी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.याच जंतरमंतर मैदानावर साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी एक महिन्याहून अधिक काळ आंदोलन केले होते, त्याच मैदानावर या लोकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.मैदानावर पोहचल्यानंतर या लोकांनी तिन्ही कुस्तीपटूंच्या विरोधात घोषणाबाजीही केल्या.

हे ही वाचा:

अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच

रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र

ओवैसी यांच्या भडकवणाऱ्या वक्तव्याचा भाजपा नेत्याकडून समाचार

बैरूतमध्ये स्फोट घडवून हमासच्या उपप्रमुखाला उडवले!

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात या तिन्ही कुस्तीपटूंनी निषेध केला होता. त्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली आणि संघाच्या नव्या निवडणूक जाहीर करण्यात आल्या. मात्र, या निवडणुकीत ब्रिजभूषण यांचे जवळचे मित्र संजय सिंह यांच्या विजय झाला.

संजय सिंह यांच्या विजयाने हे तिन्ही खेळाडू संतप्त झाले आणि त्यांनी आपले पुरस्कार परत केले.आता या तिन्ही कुस्तीपटूंच्या विरोधात जुनियर पैलवान मैदानात उतरले आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या जुनियर कुस्तीपटूंचे म्हणणे आहे की, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्या आंदोलनामुळे देशात कुस्तीच्या स्पर्धा होत नाहीयेत, आणि भारतात कुस्ती हा खेळ उद्ध्वस्त होत आहे.

दरम्यान, साक्षी मलिकने आरोप केला होता की, ब्रिजभूषण यांचे गुंड आम्हाला त्रास देत आहेत.हे गुंड आम्हाला फोन करून त्रास देत आहेत.त्यानंतर साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतल्याचे सांगितले आणि म्हणाल्या की आमच्यामुळे जूनियर्स कुस्तीपटूंचे करिअर उद्ध्वस्त होऊ नये, अशी आमची इच्छा आहे.मात्र, हेच जुनियर कुस्तीपटू या तिघांचा निषेध करत आंदोलन करताना दिसत आहेत.

 

 

 

Exit mobile version