भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रृजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी जानेवारी महिन्यापासून पुकारलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. मात्र ही लढाई न्यायालयात सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. ब्रृजभूषण यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीगिरासह अन्य कुस्तीगीरांवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे.
अव्वल कुस्तीपटू साक्षी मलिकने ट्विटरवर आंदोलन मागे घेत असल्याचे स्पष्ट करतानाच ‘न्यायालयात लढाई सुरूच राहील,’ असे स्पष्ट केले आहे. सरकारसोबत झालेल्या कुस्तीपटूंच्या बैठकीत ब्रृजभूषण सिंह यांच्यावर १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. १५ जून रोजी न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आल्यापासून कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे साक्षीने लिहिले आहे.
‘कुस्ती संघटनेमध्ये बदल करण्याच्या आश्वासनानुसार, नवीन कुस्ती संघटनेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निवडणूक ११ जुलै रोजी होणार आहे, परंतु आम्ही त्याची अंमलबजावणी होण्याची प्रतीक्षा करू,’ असेही तिने ट्वीटमध्ये लिहिले आहे.
हे ही वाचा:
‘बराक ओबामांमुळे सहा मुस्लिम राष्ट्रांवर बॉम्बहल्ला’
अधिक काम करण्यासाठी ‘केदारनाथ’ यात्रेतील ”खेचरांना देतात गांजा” !
इजिप्तच्या दौऱ्यात महिलेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ गाणे गात केले मोदींचे स्वागत
आगामी आंतरराष्ट्रीय आव्हानांसाठी आघाडीचे ३९ हॉकीपटू झाले सज्ज
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन, क्रीडा मंत्रालय आणि कुस्ती महासंघाविरुद्ध आसाम कुस्ती संघटनेने याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी घेताना गुवाहाटी उच्च न्यायालयाने रविवारी कुस्ती मंडळाच्या निवडणुकांना स्थगिती दिली.
विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अव्वल ऑलिम्पियन हे ब्रृजभूषणसिंहला अटक करण्याची मागणी करत होते. तथापि, पोलिसांनी सबळ पुराव्याअभावी अल्पवयीन कुस्तीपटूने सिंहविरुद्ध दाखल केलेली तक्रार रद्द करण्याची शिफारस केली. सिंह यांनीदेखील कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळले आहेत.