केजरीवाल सरकारने मला कोणतीही मदत केली नाही

कुस्तीगीर दिव्या काकरनचा आरोप

केजरीवाल सरकारने मला कोणतीही मदत केली नाही

नुकत्याच झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत ब्राँझ पदक जिंकणारी कुस्तीगीर दिव्या काकरनने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शरसंधान केले आहे. दिल्लीकडून खेळत असताना आपल्याला केजरीवाल यांनी मदतीचा हात दिला नाही, असे विधान तिने पत्रकार परिषदेत केले.

दिव्या काकरन म्हणाली की, मी २०१७मध्ये अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यांनी मला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मला त्यासंदर्भात पत्र लिहून कशास्वरूपाची मदत हवी हे सांगितले पण मी ते लिहून दिल्यानंतर मला मदत केली गेली नाही. त्यानंतर मी २०१८मध्ये उत्तर प्रदेशकडून खेळू लागले. २०१९ला मला उत्तर प्रदेश सरकारने राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरविले. २०२०मध्ये मला आजीवन निवृत्ती वेतनाची व्यवस्था केली. मला ५० लाखांचे बक्षीस आणि राजपत्रित अधिकारी म्हणून नोकरीही मिळाली. उत्तर प्रदेश सरकार आणि हरयाणा सरकारनेही मला मदत केली. पण दिल्ली सरकारने मला मदतीचा हात दिला नाही.

दिव्या म्हणाली की, मी अत्यंत गरीब कुटुंबातून आले आहे. माझ्याकडे प्रवासासाठी पैसेही नसत. मी रेल्वेच्या स्वच्छतागृहाजवळ बसून प्रवास केलेला आहे. दिल्ली सरकारने तेव्हा आम्हाला मदत केली नाही. मग मी २०१८ला उत्तर प्रदेशकडून खेळू लागले. मी दिल्लीसाठी ५८ पदके जिंकली पण मला सरकारने पाठिंबा दिला नाही.

हे ही वाचा:

कोणत्या रागातून पत्नीने केले पतीच्या शरीराचे तुकडे?

मुंबईकर म्हणतात राष्ट्रध्वजासोबतच काठीही द्या

माेहर्रमचे ताजिया वीजेच्या तारांना चिकटले आणि

रिझर्व्ह बँकेने केला रुपी बँकेचा परवाना रद्द

 

दिव्याने २०१७मध्ये आशियाई पदक जिंकल्यानंतर केजरीवाल यांची भेट घेतली होती पण तिला मदत मिळाली नाही, असा तिचा दावा आहे. २००१मध्ये आपण दिल्लीत आलो आणि २००६ पासून आपण कुस्ती खेळायला सुरुवात केली. २२ वर्षे मी दिल्लीत राहिले. २०१७मध्ये मी ५८ पदके जिंकली पण मनोज तिवारी यांनी येऊन मला ३ लाख रुपये दिले. त्या पैशांची मला खूप मदत झाली. त्यामुळे मग आम्ही उत्तर प्रदेशला जाण्याचा निर्णय घेतला. आम आदमी पार्टीने तिच्यावर टीका करताना ती दिल्लीसाठी खेळलीच नसल्याचा दावा केला. त्यावर दिव्याने १९व्या महिला राष्ट्रीय कुस्तीत दिल्लीच्या वतीन खेळल्याचे प्रमाणपत्र तिने ट्विटरवर टाकले.

Exit mobile version