आज कार्तिकी एकादशी आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा आज पहाटे संपन्न झाली. यावर्षी प्रथमच त्यांना कर्तिकीचा मान मिळाला आहे.
मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विठुमाऊलीची पूजा करण्याची संधी मिळाली तो अतिशय भाग्याचा दिवस असल्याचं म्हटलं आहे. फडणवीस म्हणाले, ही पूजा आहे ती मनाला शांती देणारी आहे. पांडुरंगाला एकच साकडं आहे की, हा सामान्य माणसाचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा देव आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत. त्यांचंही जीवन सुजलाम सुफलाम व्हावं. यासाठी काम करण्याची शक्ती आम्हाला मिळो, अशी प्राथना फडणवीस यांनी पांडुरंगासमोर केली असं म्हटलं आहे.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये कॉरिडॉर होणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी फडणवीसांनी कॉरिडॉरची योजना सांगितली आहे. ते म्हणाले, नुकतीचं याबद्दल बैठक पार पडली आहे. हा कॉरिडॉर करताना इथली परंपरा खंडित होणार नाही. तसेच कोणालाही विस्थापित करावं लागणार नाही. यासाठी कोणती जागा घ्यावी लागली तर योग्य पद्धतीने पुनर्वसन करणार असल्याचे आश्वसन त्यांनी दिले आहे. तसेच कॉरिडॉरचं काम करायला वेळ असला तरी मंदिराचं काम तात्कळ सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
गळ्यात टाळ,
मृदुंगाचा गजर,
ज्ञानोबा माऊली-तुकारामचा जयघोष
आणि वारकऱ्यांची साथ
मग फुगडीचा मोह कसा आवरणार?📍Pandharpur | पंढरपूर.#कार्तिकी_एकादशी #एकादशी #कार्तिकीएकादशी #KartikiEkadashi #JaiHari #विठ्ठल pic.twitter.com/U6QbBDSp9M
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 3, 2022
LIVE | Media interaction in #Pandharpur #एकादशी #Ekadashi #कार्तिकीएकादशी #KartikiEkadashi #Maharashtra https://t.co/KiZsm4h5AX
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 3, 2022
हे ही वाचा:
‘सामना’च्या पहिल्या पानावरील जाहिरातीमुळे भगवंत मान आठवले
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पायाला लागली गोळी
पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंची ‘रोजगार मोहीम’
चित्रा वाघ भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी
दरम्यान, शासकीय महापूजा झाल्यानंतर फडणवीसांनी पंढरपूर ते घुमान सायकल वारीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. संत नामदेव महाराजांनी जगाला दिलेल्या समता, बंधुता या संदेशाला उजाळा देण्यासाठी या सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही वारी दोन हजार किलोमीटर प्रवास करणार असून, ही वारी महाराष्ट्र आणि उत्तर भारतातलं स्नेह वाढवणारी ठरेल, असं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज पहाटे या सायकल वारीला सुरुवात झाली आहे.