वाई तालुक्यातील सुरुर गावात एका अल्पवयीन मुलीची पूजा करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातील युवकांनी आणि ग्रामस्थांनी पूजा करणाऱ्या मांत्रिकाला हटकल्यानंतर मांत्रिक आणि मुलीने आणि तिच्या सोबत असणाऱ्या लोकांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
सुरुर हे गाव दावजी पाटील या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. गावातील स्मशानभूमी याच मंदिरापासून काही अंतरावर आहे. या स्मशानात लाल शर्ट घातलेल्या एका मांत्रिकाने अल्पवयीन मुलीला बाहेरील लागीर झाले आहे, असे सांगून त्यावर उपाय म्हणून काही विधी करण्याचा सल्ला मुलीच्या कुटुंबीयांना दिला होता. या सल्ल्यानुसार सोमवारी (२७ सप्टेंबर) सर्वजण स्मशानात आले होते.
हे ही वाचा:
योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी
आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!
‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल
त्यानंतर मांत्रिकाने हळदी- कुंकूचे रिंगण आखून त्या शेजारी लिंबू, अंडे, नारळ आणि काळी बाहुली ठेवली. अल्पवयीन मुलीला केस मोकळे सोडून बसवण्यात आले होते. तिच्या हातात कोंबडा दिला होता. यावेळी काही विधीही करण्यात येत होत्या. ही बाब गावातील युवकांच्या आणि ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकाराला अटकाव केला आणि मांत्रिक व मुलीसोबत असलेल्या लोकांनाही या प्रकारणाबद्दल विचारले असता त्यांनी आमच्या मुलीला बाहेरची बाधा झाली आहे आणि ती काढण्यासाठी व कोंबडा देण्यासाठी इथे आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.
मुलीसोबत असलेल्या महिलांनी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गोंधळामुळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमल्यामुळे आम्ही पुणे (हडपसर) येथून आलो आहोत इतकीच माहिती देऊन या लोकांनी मांत्रिक आणि मुलीसह स्मशानभूमीतून पळ काढला.