वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये संबंधित बार वर आता कारवाई करण्यात आली आहे. जुहूतील ग्लोबल तपस बार सील करण्यात आला आहे. राज्य उत्पादन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी मिहीर शाह हा अपघातापूर्वी जुहूतील ग्लोबल तपस बारमध्ये दारू प्यायल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दिवसांच्या तपासानंतर बार वर कारवाई करत सील करण्यात आले आहे. बारचालकाकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
हे ही वाचा:
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
शरद पवार म्हणतात, शेतकऱ्यांना वीज मोफत कशाला?
‘काश्मीर टायगर्सने’ घेतली कठुआ दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी !
भुलवून रशियन सैन्यात भरती केलेल्या भारतीयांची होणार सुटका
दरम्यान, या प्रकरणातील मुख्यआरोपी मिहिर शहा हा अद्याप फरार असून मिहिर शहाच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी ११ पथके स्थापन केली आहेत. याशिवाय गुन्हे शाखेकडूनही शोध घेतला जात आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेले राजेश शाह यांना जामीन मंजूर झाला आहे. पोलिसांनी राजेश शाह यांना काल (८ जुलै) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी सुनावताच राजेश शाह यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर १५,००० रुपयांच्या तात्पुरत्या रोख रकमेवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.