वरळी कार अपघात प्रकरण, राजेश शाहला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

गाडी चालकाला एक दिवसीय पोलीस कोठडी

वरळी कार अपघात प्रकरण, राजेश शाहला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

वरळी हिट अँड रन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेश शाह यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी आज(८ जुलै) त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यासह राजेश शाह यांची अटक कोर्टाने बेकादेशीर ठरवली आहे.

राजेश शाह सध्या अटकेत आहेत. अटक करण्यात आलेला गाडी चालक राजऋषी बिडावत याला देखील एक दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान, राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. जेव्हा अपघात झाला त्या रात्री मिहीर शाह याने पबमध्ये पार्टी केल्याचेही उघड झाले आहे. पोलीस देखील या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हे ही वाचा:

रायगडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस; किल्ल्याच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून लष्कराच्या वाहनावर गोळीबार

खोट्या बातम्या देणाऱ्या मुस्लीम पत्रकारांवर गुन्हा

बालाघाटमध्ये चकमक, १४ लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. शिंदे गटाचा कार्यकर्ता असला तरी सर्वांना समान न्याय देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांना तशा सूचना दिल्या आहेत. राजकीय दबावाला बळी न पडता योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांनी दिल्या आहेत.

Exit mobile version