अबब ३००० लिटर तेलाचा भव्य दिवा

१,००० किलो स्टीलपासून बनण्यात आलेली पणती

अबब  ३००० लिटर तेलाचा भव्य दिवा

दिवाळीत पणतीचे महत्व खूप असते. प्रत्येकाच्या दारात वेगवेगळ्या पणत्या बघायला मिळतात. यावर्षीच्या दिवाळीत पंजाबच्या मोहालीमधील एक भव्य दिव्य पणती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ही पणती मातीची नाही तर स्टीलची आहे. तब्बल १,००० किलो स्टीलपासून बनण्यात आलेली पणती जगातील सर्वात मोठी पणती असल्याचे म्हटले जात आहे. जागतिक शांततेचा संदेश देण्यासाठी हा दिवा लावण्यात आल्याचा दावा कार्यक्रमाच्या आयोजकांनी केला आहे.१०,००० लोकांचे योगदान दिलेल्या या पणतीने जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.

हा ३.३७ मीटर व्यासाचा जगातील सर्वात मोठा दिवा शनिवारी संध्याकाळी प्रज्वलित करण्यात आला. लेफ्टनंट जनरल केजे सिंग (निवृत्त) यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हीरो होम्सच्या ४,००० रहिवाशांसह १०,००० पेक्षा जास्त नागरिकांनी, शांततेचा अनोखा संदेश देणारा हा दिवा तयार केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत विशाल दिवा प्रज्वलित करण्यात आला. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनुसार हा दिवा ३,००० लिटर स्वयंपाकाच्या तेलाने पेटवण्यात आला असून हा जगातील सर्वात मोठा तेल दिवा असल्याचा दावा हिरो रियल्टीचे सीएमओ आशिष कौल यांनी केला आहे.

हे ही वाचा:

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी

पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

इस्रोची दिवाळी भेट, सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

कौल म्हणाले की, दिवाळी शांतता आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. प्रांत, भाषा, धर्म आणि इतर सांस्कृतिक पंथांची पर्वा न करता वेगवेगळ्या व्यक्तींकडून दिव्यासाठी तेल गोळा केले गेले आहे . दिवाळीच्या मुहूर्तावर अयोध्येत सर्वात मोठी दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळीनिमित्त राम नगरी सजवली गेली आणि एकाच वेळी १७ लाख दिव्यांची रोषणाई करण्याचा विक्रम झाला.

Exit mobile version