राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून लडाख येथे जगातील सर्वात मोठा खादी पासून बनवलेला भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे लडाखची राजधानी असलेल्या लेह येथे हा तिरंगा फडकवला गेला आहे.
या तिरंग्याची लांबी २२५ फूट असून त्याची उंची १५० फूट आहे. तर या तिरंग्याचे वजन तब्बल एक टन इतके आहे. हा तिरंगा पूर्णपणे खादी पासून बनवण्यात आला आहे. मुंबईच्या खादी ड्रायर्स आणि प्रिंटर्स यांनी हा तिरंगा तयार केला असून तो बनवण्यासाठी तब्बल दीड महिन्यांचा कालावधी लागला आहे. लडाखचे नायब राज्यपाल आर. के. माथुर यांच्या हस्ते या राष्ट्रध्वजाचे अनावरण करण्यात आले असून यावेळी भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल नरवणे हे देखील उपस्थित होते.
#WATCH World's largest Khadi national flag installed in Leh town, inaugurated by Ladakh Lieutenant Governor RK Mathur
Army Chief General Manoj Mukund Naravane also present pic.twitter.com/6lNxp0lM0n
— ANI (@ANI) October 2, 2021
हे ही वाचा:
‘आगामी सरकार बनविण्यासाठी नव्हे; तर देश घडविण्यासाठी सरकार चालवले पाहिजे’
शिवसेनेचा सत्ताग्रह! ठाणे महापालिकेत गांधींचा विसर
शहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करणार
मी स्वतः भारतीय लस घेतली आहे, यूएनजीए अध्यक्षांनी जगाला सांगितले
महात्मा गांधी हे खादीचे खूप मोठे समर्थक होते. तर भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील खादी वापरण्याच्या संदर्भात आग्रही असतात. नुकतेच त्यांनी मन की बात मधून महात्मा गांधींच्या जयंती दिवशी खादी उत्पादने खरेदी करण्याबाबत आवाहन केले होते. तर ‘आज स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत असताना आपण समाधानाने हे म्हणू शकतो की स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी खादीचे जे महत्व होते, त्याच प्रकारचा सन्मान तरुण पिढी खादीला देताना दिसत आहे.’ असे मोदी म्हणाले होते.