पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या वाहन चालकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. चारचाकी सीएनजी वाहनांना बाजारात वाढती मागणी असतानाच आता जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करण्यात आली आहे. पुण्यात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेळी, ही सीएनजी बाईक जगातील पहिली सीएनजी दुचाकी असल्याचा दावा बजाजकडून करण्यात आला आहे.
बजाजने वाढत्या पेट्रोलच्या दराला पर्याय म्हणून सीएनजी बाईकची निर्मिती केली आहे यामुळे सामान्य वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जगातल्या पहिल्या सीएनजी बाईकचे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झालं. या बाईकमुळे दुचाकीस्वारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा..
हिंदुत्ववादी शिवानी राजा ब्रिटनच्या निवडणुकीत जिंकल्या!
तोंडावर आपटलेल्या काँग्रेसचे पुन्हा लष्करावर प्रश्नचिन्ह!
पंतप्रधान मोदींचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंशी संवाद
सीएनजी बाईकची किंमत एक लाखांपेक्षा कमी असावी, अशी अपेक्षा या सोहळ्या प्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. “प्रदूषणमुक्त भारत करण्याचं सर्वात मोठं ध्येय आहे. त्याअनुषंगाने सीएनजी बाईक या ध्येयाला मोठा हातभार लावेल यात शंका नाही. वाहन उद्योग क्षेत्रात भारताचा आधी जगात सातवा नंबर होता. आता, अलीकडच्या तीन महिन्यांपूर्वीच आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचलो आहोत. पहिला यूएसए, दुसरा चीन आणि मग भारताचा नंबर लागतो. वाहन उद्योग क्षेत्रात भरारी घेतोय,” असे नितीन गडकरी म्हणाले. बजाज कंपनीने या बाईकची निर्मिती केलीये, यासाठी नितीन गडकरी यांनी अभिनंदन केले. बाईक निर्मित्ती प्रक्रियेत असलेल्या प्रत्येकाचे टीमवर्क म्हणून गडकरींकडून अभिनंदन करण्यात आले.