27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषमहामार्गाच्या कडेला तुम्हाला पाहायला मिळणार 'बाहुबली'

महामार्गाच्या कडेला तुम्हाला पाहायला मिळणार ‘बाहुबली’

बांबूंचा असाही उपयोग पाहायला मिळणार

Google News Follow

Related

प्रवास करतांना रस्त्याच्या दुतर्फा अपघातापासून बचाव करण्यासाठी क्रॅश बॅरियर म्हणजेच भक्कम कठडे लावलेले दिसतात. हे कठडे स्टीलचे असतात. पण आता या स्टीलची जागा बांबूने घेतली आहे.

बांबूपासून तयार करण्यात आलेला हा जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर आहे. हा क्रॅश बॅरियर इतका भक्कम आहे की त्याला बाहुबली असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करताना देशातील बांबू लागवडीपासून तयार करण्यात आला आहे.

आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकत महराष्ट्रातल्या विदर्भ भागात वणी-वरोडा महामार्गावर जगातील पहिले २०० मीटर लांब बांबू क्रॅश बॅरियर म्हणजेच बाहुबली बांबू क्रॅश बॅरियर उभारण्यात आले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात क्रॅश बॅरियरसाठी स्टीलची गरज भासणार नाही. त्यामुळे मोट्या प्रमाणावर मोठ्या खर्च आणि देखभालीची बचत होण्यास मदत होणार आहे.

बांबू क्रॅश बॅरियर हा उपक्रम मैलाचा दगड मानला जात आहे. कारण बांबू हा देशाच्या मोठ्या भागाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे आणि त्याचा फायदा गावांच्या आर्थिक विकासासाठी आणि शेतीला चालना देणार्‍या उद्योगांनाही होणार आहे.

सर्व कडक तपासण्या उत्तीर्ण

या कठड्यासाठी बांबुशा बालकोआ जातीच्या बांबूचा उपयोग करण्यात आला आहे. डांबरापासून बनवलेल्या क्रिओसोट या लाकूड रक्षक तेलाने त्यावर प्रक्रिया केली गेली आहे. तसेच हाय-डेन्सिटी पॉली इथिलीनचे लेपन त्यावर करण्यात आले आहे.या बांबूच्या कुंपण्याचा टिकावूपणा तपासण्यासाठी इंदूरमधल्या पिथमपूर येथील नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स सारख्या विविध सरकारी संस्थांमध्ये अनेक कठोर परीक्षा घेण्यात आल्या.रुरकी येथील सीबीआरआय संस्थेत घ्या आलेल्या आगनिरोधक चाचणीत या कठड्याला प्रथम श्रेणी मिळाली आहे. इंडियन रोड काँग्रेसनेही त्याला मान्यता दिली आहे.

हे ही वाचा :

‘आपल्याच पक्षातील आमदारांना संपवायचे आणि दुसरीकडून भाड्याने घ्यायचे, हे उद्धव ठाकरेंचे काम’

अटक वारंट घेऊन पोलीस धडकले इम्रान खानच्या घरी.. कधीही होऊ शकते अटक

लोकांचा ‘आशीर्वाद’ घेण्यासाठी भाजपाची यात्रा

६० नाही तर आता ९० सेकंदांपर्यंत फेसबुक रिल्स करा अपलोड

पुनर्वापराचे प्रमाण ५० ते ६० टक्के

सध्या हे कठडे २०० मीटरच्या परिघात आहेत. परंतु भविष्यात देशातील सुमारे २.५ लाख किलोमीटर महामार्ग तसेच राज्यांच्या स्वतःच्या रस्त्यांसाठी आधार मोठा आधार ठरू शकतात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या यशाबद्दल ट्विट केले आहेत. हे मोठे यश असल्याचे असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.बांबूपासून बनवलेल्या क्रॅश बॅरिअर्सचा पुनर्वापराचे प्रमाण ५० ते ६० टक्के तर स्टील बॅरिअर्सचे ३०ते ५० टक्के आहे असल्याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले आहे. .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा