24 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषसुस्वागतम् २०२२

सुस्वागतम् २०२२

Google News Follow

Related

२०२२ या नव्या वर्षाचे जगभर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. २०२१ ला अलविदा म्हणत नव्या वर्षाचे हसतमुखाने स्वागत केले आहे. वर्षभर साऱ्या जगाचा कारभार ज्या कॅलेंडरप्रमाणे चालतो त्याचे हे नवे वर्ष सकारात्मक जावो अशी अपेक्षा साऱ्यांनीच व्यक्त केली आहे.

कोरोना या जागतिक महामारीचा नायनाट अद्यापही झालेला नाही. त्याचे सावट कायम आहे. तरीदेखील नवीन वर्षाचे स्वागत करताना जगभरातील लोकांचा उत्साह अजिबात कमी झालेला दिसला नाही. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे मोठ्या आनंदात लोकांनी स्वागत केले. विद्युत रोषणाई, लेझर शो, फटाक्यांची आतषबाजी या सगळ्याने ३१ डिसेंबरची रात्र झगमगून गेलेली पाहायला मिळाली. ठिकठिकाणच्या कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून लोक एकत्र येत २०२२ या नव्या वर्षाला वेलकम करताना दिसले. अनेक ठिकाणी संगीत, नृत्य, वाद्यवृंद यांच्या चालीवर लोकांनी नव्या वर्षाची सुरुवात केली.

हे ही वाचा:

नोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी

कंगना रानौतला न्यायालयाचा धक्का!

समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?

५० रुपये चोरले म्हणून वडिलांनी केली मुलाची हत्या

गेल्या वर्षभरातल्या अनेक कटू गोड आठवणींना अनेकांनी उजाळा दिला. तर आगामी वर्ष हे संपूर्ण जगासाठी सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे जावो अशी विश्वशांतीची प्रार्थना ही अनेक जण करताना दिसले. धार्मिक स्थळांवरही भाविक दर्शनासाठी आलेले पाहायला मिळाले, दरवर्षी जगभरातले कोट्यवधी नागरिक नव्या वर्षाचे स्वागत हे भगवंताच्या चरणी माथा टेकून करतात. त्यामुळे भारतातील मंदिरे, तसेच परदेशातील चर्चही गजबजलेले पाहायला मिळाले.

सोशल मीडियावरही नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह ओसंडून वाहत होता. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सर्व समाज माध्यमांचा वापर करून लोक आपल्या सर्व मित्र परिचित आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना पहायला मिळाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा