दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचे पत्र मिळाले तब्बल ७६ वर्षांनी

दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचे पत्र मिळाले तब्बल ७६ वर्षांनी

जर्मनीत तैनात असलेल्या एका अमेरिकन सैनिकाने त्याच्या आईला पाठवलेले पत्र तब्बल ७६ वर्षांनी त्याच्या विधवा पत्नीच्या हाती लागले आहे. पिट्सबर्गमधील यूएस पोस्टल सर्व्हिस मध्ये अनेक वर्षांनी हे पत्र सापडले. आणि मग ते वितरण करण्यात आले.

आर्मी सार्जेंट जॉन गोन्साल्विस जेव्हा २२ वर्षाचा होता तेव्हा त्याने दुसऱ्या महायुद्धानंतर डिसेंबर १९४५ मध्ये वोबर्न येथे आपल्या आईला पत्र लिहिले होते.

७५ वर्षांहून अधिक काळ न उघडलेल्या पत्रात असे लिहले होते की, ‘ प्रिय,आई. आज तुझ्याकडून दुसरे पत्र मिळाले आणि सर्व काही ठीक आहे हे ऐकून आनंद झाला. मी ठीक आहे . पण इथे अन्न आहे ते बहुतेक वेळा खूपच खराब असते. मी लवकरच तुम्हाला भेटायला येणार आहे.’ आणि शेवटी पत्रावर त्याने स्वाक्षरी केली.

जॉनी गोन्साल्विस, हे सहा वर्षांपूर्वी २०१५ ला वयाच्या ९२ व्या वर्षी मरण पावले आहेत. त्यांच्या आईचेही निधन झाले. मात्र, यूएसपीएसला त्यांच्या विधवा पत्नी अँजेलिना हीचा पत्ता सापडला. आणि मग त्या पत्त्यावर यूएसपीएसने ते पत्र पाठवले.
सात दशकाहून अधिक उलटलेल्या या पत्रासोबत यूएसपीएस कर्मचार्‍यांनी स्वतः लिहलेले एक पत्रदेखील पाठवले होते. त्या पत्रात त्यांनी लिहिले होते की, ‘ हे पत्र वितरित करणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आह. ‘ गोन्साल्विस कुटुंबीयांना हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी फोन करून संबंधितांचे आभार मानले.

हे ही वाचा:

चोरीनंतर चोराने व्यक्त केला अनोख्या पद्धतीने पश्चात्ताप!

हिमवादळात अडकलेल्या पर्यटकांचे स्नो बाइकर्सने वाचवले प्राण

नीरज चोप्राच्या गौरवार्थ डाक विभागाची सोन्याची पत्रपेटी

बदलणार वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे रूप

 

गोन्साल्विस यांनी यूएस आर्मीमध्ये सार्जंट म्हणून काम केले आणि त्यांनी जेव्हा पत्र पाठवले त्या वेळी ते जर्मनीमध्ये आर्मर्ड डिव्हिजनमध्ये तैनात होते .

Exit mobile version