भारताच्या प्रतिष्ठित G20 अध्यक्षतेच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान १४व्या जागतिक मसाला परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्राच्या स्पायसिस बोर्डाचे सचिव डी. साथियन यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अख्यातरित मसाला बोर्डाने विविध व्यापार आणि निर्यात मंचाच्या सहकार्याने आयोजित केलेली ही जागतिक मसाला परिषद मसाला क्षेत्रासाठी सर्वात मोठ्या व्यावसायिक व्यासपीठांपैकी एक अशी ठरणार आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक अधिकारी, मसाला व्यापार संघटना, सरकारी अधिकारी तसेच G20 देशामधील तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
मसाल्यांच्या व्यापाऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष व्यावसायिक सत्रे आयातदारांबरोबर रिव्हर्स बायर सेलर मीट आयोजित करण्यात आली आहे. १९९० मध्ये जागतिक मसाला परिषद स्थापन झाली. तेव्हापासून अशा पद्धतीच्या परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. या सत्रामध्ये पिके आणि बाजार अंदाज व कल, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानके, प्रमाणपत्रे, औषधी पौषकसंबंधी अभिनव आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उत्पादनांमध्ये मसाल्यांना वाव आणि संधी, चव वाढवणारे मसाले आणि अन्नपदार्थ यासह पॅकेजिंग संदर्भात आवश्यकता, जागतिक मसाला पेठेतील कल आणि संधी यावर चर्चा होणार आहे.
हे ही वाचा:
आज लोकसभा निवडणुका झाल्यास कोण मारणार बाजी?
पारंपरिक कारागिरांना मिळणार लाखाचे कर्ज; व्याज फक्त ५ टक्के
गुलाम नबी आझाद म्हणतात, मुस्लिमांचे पूर्वज हे हिंदूच!
ईक्विप्ड सिनियर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश
जागतिक मसाला परिषद २०२३ चा भाग म्हणून मसाला आणि मूल्यवर्धीत मसाला उत्पादनांच्या विविध श्रेणी तसेच मसाला उद्योगातील अभिनव तंत्रज्ञान आणि उपाय अधोरेखित करणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. टेक टॉप, नवीन उत्पादनाचे उद्घाटन आणि कुकरी शो अशी सत्रे यानिमित्ताने होणार आहे. नवी मुंबईमधील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शानात सहभागी होण्याचे आवाहन मसाला बोर्डाने केले आहे.