22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषपुढच्या वर्षी अमेरिकेत दुसऱ्या विश्व मल्लखांबाचा मनोरा

पुढच्या वर्षी अमेरिकेत दुसऱ्या विश्व मल्लखांबाचा मनोरा

Google News Follow

Related

२०१९ साली मुंबईत झालेल्या मल्लखांबाच्या पहिल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताबाहेरील १५ देशांच्या खेळाडूंनी भाग घेतला होता आणि समारोपाच्या वेळेस विश्व मल्लखांब संघटनेचा ध्वज पुढच्या स्पर्धेसाठी मल्लखांब फेडरेशन यू. एस्. ए. चे प्रतिनिधी ओंकार देशपांडे यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला होता. आता ही स्पर्धा २०२२मध्ये अमेरिकेत होणार आहे.  दर दोन वर्षांनी होणार असलेली मल्लखांबाची ही विश्व अजिंक्यपद स्पर्धा अमेरिकेत खरे तर २०२१ साली होणार होती, पण अकस्मात उद्भवलेल्या कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे ही स्पर्धा आता नियोजित वेळेपेक्षा एका वर्षानी पुढे म्हणजे सप्टेंबर २०२२ मध्ये मल्लखांब फेडरेशन यू. एस्. ए. यांच्या वतीने अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. संयोजन सचिव चिन्मय पाटणकर, अमेरिकन मल्लखांब फेडरेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा पाटणकर व अमेरिका-कॅनडा मधील अनेक माजी मल्लखांबपटू, प्रशिक्षक, पालक या त्यांच्या चमूने कोरोनाच्या अत्यंत प्रतिकूल काळातही ज्या उमेदीने, उत्साहाने व चिकाटीने या दुसऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेची तयारी सुरु केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताला ४० देशांकडून मदत प्राप्त

मनसुखची हत्या करण्यात आलेली  कार जप्त ?

महाराष्ट्रातही चित्रीकरणाला परवानगी द्या

ममतांनीच जिल्हाधिकाऱ्यांना बोलू दिलं नाही

मल्लखांबाच्या पहिल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेल्या १५ देशांतील तसेच काही कारणांनी सहभागी होऊ न शकलेल्या अनेक देशातील प्रतिनिधींची मल्लखांब फेडरेशन यू. एस्. ए. नी नुकतीच ‘ऑनलाईन  व्हर्च्युअल किक ऑफ मीटिंग’ घेतली होती.  त्या ‘झूम’ बैठकीला मेक्सिको, कॅनडा, फ्रान्स, यू. के., नेपाळ, बांगला देश, मलेशिया, जपान, सिंगापूर, अमेरिका, भारत, ब्राझील तसेच पोलंड या देशांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष हजर होते.

विश्व मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष कृष्णकुमार तसेच महासचिव उदय वि. देशपांडे यांनाही या बैठकीस निमंत्रित करण्यात आले होते. संयोजन सचिव चिन्मय पाटणकर हे मल्लखांबाचा ध्यास घेतलेले मूळचे पुण्यातील राष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त  मल्लखांबपटू असल्याने व गेली २० वर्षे अमेरिकेत स्थायिक असून संगणकीय क्षेत्रात नोकरी करीत असल्याने तेथेही अव्याहतपणे मल्लखांबाची पाळेमुळे रुजविण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न चालविला आहे.

त्यांनी पुढील सोळा महिन्यातील दुसऱ्या विश्व मल्लखांब स्पर्धेच्या वाटचालीतील विविध टप्प्यांची माहिती दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे करून दिली. त्याअंतर्गत स्पर्धेचा शुभारंभ तसेच मल्लखांब प्रेमी मंडळींचे एकत्रीकरण (जून ते डिसेंबर २०२१), क्रीडा ज्योत, सर्व सहभागी देशात एका आठवड्याचे मल्लखांब शिबीर (जानेवारी २२ ते जून  २०२२), न्यूयॉर्क  रोड शो, अमेरिकेत ‘युनो’च्या तसेच विविध दूतावासांच्या कार्यालयांसमोर मल्लखांब प्रात्यक्षिके (ऑगस्ट २०२२), सांस्कृतिक प्रदर्शन, दुसरी विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा (सप्टेंबर २०२२). श्रमपरिहार, आभार  प्रदर्शन (सप्टेंबर २०२२ ) असे टप्पे असतील. सहभागी देशातील मल्लखांबपटूंना अमेरिकेत येण्यासाठी व्हिसा मिळवून देण्याचे प्रयत्न, त्या त्या देशांमध्ये मल्लखांब क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत, ‘ग्लोबल इंश्युरंस’चे सहकार्य, अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी मौलिक माहिती दिली.

या पहिल्या ‘किक ऑफ मिटींग’ला उपस्थित असलेल्या तेरा देशांखेरीज पहिल्या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत भाग घेणारे स्पेन, झेक रिपब्लिक, इटली, नॉर्वे, जर्मनी, व्हिएतनाम, बहारीन, हे देश या दुसऱ्या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेलाही संघ पाठवतील आणि ऑस्ट्रिया, मॉरीशियस, दक्षिण आफ्रिका, रशिया, हॉंगकॉंग, लिथुएनिया, आयर्लंड, ग्रीस, अर्जेन्टिना, व्हेनेझुएला, स्लोवेनिया, फिलिपाईन आणि भूतान असे अनेक देश या दुसऱ्या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत भाग घेण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा