जागतिक होमिओपॅथी दिनाच्या निमित्ताने येत्या १० एप्रिल रोजी पुनर्वास एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन डी. जी. खेतान इंटरनॅशनल स्कूल ऑडिटोरियम, सुंदर नगर, मालाड पश्चिम येथे होत आहे.
हे ही वाचा:
“दिग्गजांचं ‘पावरप्ले’ बंद… RCBचं वर्चस्व सुरू!”
श्रेयस अय्यर – मार्च महिन्याचा खरा सुपरस्टार
यमुनानगरमध्ये पंतप्रधान करणार थर्मल पॉवर युनिटचे भूमिपूजन
उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ७ वर्षांचा मुलगा आगीच्या कचाट्यात!
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील सहआयुक्त प्रसाद खैरनार (मुंबई उपनगर समाज कल्याण), विशेष अतिथी असतील बेस्ट रोडवेजचे अध्यक्ष जयकुमार गुप्ता, होमिओपॅथीमधील तज्ज्ञ डॉ. तन्मय विजयकर.
या कार्यक्रमासाठी पुनर्वास एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एस.एस. गुप्ता, सचिव विनोद पोदार, सहसचिव ओ.पी. जोशुआ, खजिनदार राकेश भागेरिया व प्राचार्य शुभांगी पोवार यांनी सर्वांना आमंत्रित केले आहे.