जगविख्यात मराठमोळे शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आशिष याने देश- विदेशात अनेक स्पर्धा जिंकत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यासारखे अनेक मानाचे किताब आशिष यांनी पटकावले होते. मात्र, दुर्दैवाने आजारपणाने त्यांची प्राणज्योत मालवली
गेल्या काही दिवसांपासून आशिष साखरकर हे आजाराशी झुंज देत होते. त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवार, १९ जुलै रोजी आशिष यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात आशिष साखरकर यांना बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील आयकॉन मानलं जातं. काही दिवसांपूर्वी आशिष साखरकर यांना आजारानं ग्रासलं होतं. याच आजारावर गेल्या काही दिवसांपासून आशिष साखरकर उपचार घेते होते. पण अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. त्यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्यांचे चाहते आणि मित्रमंडळी श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
आशिष साखरकर यांनी पटकावलेले सन्मान
- मिस्टर इंडिया – चार वेळा विजेतेपद
- फेडरेशन कप – चार वेळा विजेतेपद
- मिस्टर युनिव्हर्स – रौप्य आणि कांस्य
- मिस्टर आशिया – रौप्य
- युरोपियन चॅम्पियनशिप
- शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त
हे ही वाचा:
भागवत कराड घेणार सात कोटींचे घर
आंदोलनकर्त्या विनेशविरोधात युवा कुस्तीगीराची लढाई न्यायालयात
देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यात दोन जणांना घेतलं ताब्यात
आंदोलनात उतरलेल्या बजरंग, विनेशची थेट निवड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आशिष साखरकर यांना ट्वीटवरवर श्रद्धांजली अर्पण केली आहे. “बॉडीबिल्डिंग विश्वातील मान्यवर असलेल्या आशिष साखरकर यांच्या निधनाने मन हेलावून गेले आहे. त्यांच्या जाण्याने बॉडी बिल्डिंग क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच साखरकर परिवारातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्र श्री, चार वेळा मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स अशा अनेक नामांकित किताबांवर आपली मोहोर उमटवणारे आशिष साखरकर यांचे दुःखद निधन झाले आहे. बॉडीबिल्डिंग विश्वातील मान्यवर असलेल्या आशिष साखरकर यांच्या निधनाने मन हेलावून गेले आहे. त्यांच्या जाण्याने बॉडी बिल्डिंग क्षेत्राचे… pic.twitter.com/ux8bNdpmjC
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 19, 2023