भारतीय महिला क्रिकेट संघाला मिळाला पाच कोटींचा चेक

सचिन तेंडुलकरने केले महिला संघाचे कौतुक

भारतीय महिला क्रिकेट संघाला मिळाला पाच कोटींचा चेक

टी-२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाचे आगमन गुरुवारी भारतात झाले. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर हा विश्वविजयी भारतीय संघ उतरला. हा संघ विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत झाले. बुधवारी या संघाला बीसीसीआयच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले होते.

अहमदाबाद येथे या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बीसीसीआयचे सचिव जय शहा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला होता. या विश्वविजयी संघाची कर्णधार शेफाली वर्माने बीसीसीआयकडून विजेतेपदाचे बक्षीस स्वीकारले. या संघाला बीसीसीआयकडून ५ कोटींचे इनाम देण्यात आले. गेल्याच आठवड्यात बीसीसीआयने या संघासाठी आणि संघासोबत असलेल्या मदतनीसांसाठी रोख पुरस्काराची घोषणा केली होती.

हे ही वाचा:

मतपेटीमध्ये ठरणार आज कोणाचा होणार जय

पुण्यातील कोयता गँगचा ‘आधार’च काढून घेणार

आरोग्य सुधारणार ..या आजारांचे होणार समूळ उच्चाटन

धामी सरकारचे योगींच्या पावलावर पाऊल

सचिन तेंडुलकर तेव्हा या खेळाडूंशी संवाद साधताना म्हणाला होता की, या विश्वविजयामुळे भारतातील अशा अनेक क्रिकेट खेळणाऱ्या मुलींना राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी प्रेरणा मिळेल. महिला प्रीमियर लीगही मुलींच्या क्रिकेटसाठी नक्कीच प्रोत्साहन देईल. २९ जानेवारीला भारतीय महिलांनी हे विजेतेपद पटकाविले होते. इंग्लंडवर त्यांनी ७ विकेट्सनी मात करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.

इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ ६८ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय महिलांनी ३ विकेट्स गमावून १४ षटकांत निर्धारित लक्ष्य पार केले. दिल्लीत हा संघ पोहोचल्यावर भारतीय संघाची खेळाडू पार्शवी चोप्राने सांगितले की, भारताला प्रथमच महिलांच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये हे यश मिळाले आहे. त्यामुळे आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे. मी स्वतः खुश आहे पण आता जशी संधी मिळेल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असे मी ठरविले आहे. संघातील खेळाडू अर्चना देवीने सांगितले की, सचिन तेंडुलकरला भेटून मला खूप आनंद झाला. माझे स्वप्न पूर्ण झाले.

Exit mobile version