भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषक फायनल सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला.हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते.मात्र, सामना संपल्यानंतर स्टेडियममधून तब्बल एक टनहून (१००० किलो) अधिक प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषक फायनल सामन्यावर देशासह जगाचे लक्ष लागून होते.१९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडला.क्रिकेट विश्वचषक फायनल भारत क्रिकेट संघ जिंकेल अशी अशा सर्वांना होती.मात्र, ऑस्ट्रेलिने बाजी मारली आणि भारतीय क्रिकेट संघाला हार पत्करावी लागली.
दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर एक लाखाहून अधिक प्रेषक उपस्थित होते.हा सामना पार पडल्यानंतर स्टेडियमची साफ-सफाई केली असता स्टेडियममधून तब्बल एक टन प्लास्टिक कचरा जमा झाला. मात्र, हा प्लास्टिक कोठेही फेकण्यात आला नाही किंवा जाळून त्याची विल्हेवाट लावली नाही तर या प्लास्टिक काचऱ्यापासून बसण्यासाठी प्लास्टिक बेंच आणि रिफ्लेक्टर जॅकेट तयार करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
सीएएची अंमलबजावणी करण्यापासून कोणी रोखू शकत नाही!
शेख हसिनांकडून मुस्लिमांचे लांगुलचालन!
केएल राहुलने भारताचा खेळ सावरला!
बीसीसीआयचा निर्णय; आयपीएल स्पॉन्सरशिपमध्ये चीनसाठी दरवाजे बंद
अहमदाबादमधील एक स्वयंसेवी संस्था आहे.या स्वयंसेवी संस्थेने या प्लास्टिक कचऱ्यापासून १० बेंच आणि जॅकेट बनवले आहेत.हे १० बेंच आणि जॅकेट अहमदाबाद महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक बेंच बनवण्यासाठी पन्नास किलो प्लास्टिकचा कचरा वापरण्यात आला.स्वयंसेवी संस्थेकडून देण्यात आलेले हे बेंच लवकरच अहमदाबादमधील उद्यानांत बसवले जाणार आहे.तसेच एक रिफ्लेक्टर जॅकेट तयार करण्यासाठी दहा प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे.हे जॅकेट महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.