पितृपक्षातही टीव्हींची धडाक्यात विक्री!

भारतात विश्वचषकाचा ज्वर

पितृपक्षातही टीव्हींची धडाक्यात विक्री!

क्रिकेट हा जर भारताचा धर्म मानला तर विश्वचषक हा या क्रिकेटधर्मियांचा सर्वांत मोठा सण असतो. त्याचा प्रत्यय यंदाही येत आहे. त्यातच यंदा भारतच या विश्वचषक स्पर्धेचे आयोजक असल्याने क्रिकेटप्रेमाला भरते आले आहे. एरवी पितृपक्षात कोणत्याही वस्तूंची खरेदी करण्यास टाळणाऱ्या भारतीयांकडून यंदा मात्र टीव्हींची धडाक्यात खरेदी केली जात आहे.

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना अवघ्या काही दिवसांवर आला असताना प्रेक्षकांनाही घरोघरी टीव्ही बसवण्याची घाई झाली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते टीव्हींच्या विक्रीत वाढ झाली आहे. त्यामुळे नवरात्र आणि दिवाळीच्या आधीच टीव्हींच्या धडाक्यात विक्री सुरू झाली आहे. त्यातही अनेक ग्राहक मोठमोठ्या स्क्रीनच्या टीव्हींना पसंत देत आहेत. पितृपक्षात सॅमसंग, शिओमी, सोनी, एलजी आणि पॅनोसोनिक कंपन्यांच्या टीव्हींच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अचानक वाढलेली ही मागणी पूर्ण करताना आणि लगेचच घरी टीव्ही बसवताना कंपन्यांच्या आणि त्यांच्या माणसांना नाकी नऊ येत आहेत.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानात पुन्हा ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

फक्त पॅलेस्टिनी का? गिलगिट-बाल्टीस्तानच्या मुस्लिमांनी काय घोडं मारलंय?

ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो व्हायरल!

पाकिस्तानने श्रीलंकेला नमवले

‘आपल्या सर्वांना चांगलेच माहितीये की, भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नाही. तर, तो जवळपास एक धर्मच आहे. तसेच, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ विजेतेपदाचा दावेदार मानला जात असताना भारतीयांच्या उत्साहाला भरते आले आहे. तसेच, आगामी भारत-पाकिस्तान यांच्यात शनिवारी होणाऱ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर तर त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे,’असे एलजी इंडियाचे गिरीसन गोपी यांनी सांगितले. धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या प्रकारे विक्री होत असते, तोच उच्चांक शुक्रवारी आणि शनिवारी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विशेषतः मोठ्या स्क्रीनच्या टीव्हींची अधिक विक्री होईल, असा त्यांचा दावा आहे.

एलजी आणि अन्य कंपन्या तसेच, ऑनलाइन विक्रेत्यांनीही क्रिकेटच्या उत्सवाचा फायदा घेण्यासाठी त्यांचा ‘फेस्टिव्ह सेल्स’ ही जरा अलीकडेच आणला आहे. ‘गेल्या वर्षीच्या पितृपक्षापेक्षा यंदाच्या ५५ इंच आणि अधिक आकाराच्या टीव्हींच्या विक्रीत दोन ते अडीचपट वाढ झाली आहे,’ असे गोपी यांनी सांगितले. सॅमसंगच्या मोहनदीप सिंग यांनीही मोठ्या स्क्रीनच्या टीव्हींना चांगली मागणी असल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version