25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषविराट कोहलीने बाबरला दिली स्वाक्षरी केलेली जर्सी!

विराट कोहलीने बाबरला दिली स्वाक्षरी केलेली जर्सी!

वृत्तसंस्था, अहमदाबाद

Google News Follow

Related

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक लढतीत विजय मिळवल्यानंतर या दोन्ही संघांमधील खेळाडूंमधील हलकेफुलके क्षणही समोर येत आहेत.

भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी देशांमधील लढतीचे सर्वांनाच आकर्षण असते. दोन्ही देशांमधील क्रिकेटप्रेमी या सामन्याकडे डोळे लावून बसलेले असतात. भारत आणि पाकिस्तानमध्ये राजकीय स्तरावर कितीही ताणतणाव असले तरी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंमध्ये नेहमीच एक मैत्रीचे नाते राहिले आहे. शनिवारीदेखील मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या भारत-पाक सामन्यादरम्यान विराट कोहली आणि बाबर आझम हे चर्चा करताना दिसले.
भारत-पाकिस्तान यांच्यातील रोमहर्षक लढत संपल्यानंतर कोहली याने स्वतःची स्वाक्षरी केलेली जर्सी बाबरला भेट दिली. पाकिस्तानच्या संघाने हा सामना सात विकेटने गमावला असला तरी बाबरने चेहऱ्यावर छानसे स्मित देत कोहलीने भेट दिलेली ही जर्सी स्वीकारली.

सामना झाल्यानंतर बाबर याने पाकिस्तानच्या पराभवाची कारणेही विशद केली. फलंदाज एकामागोमाग एक बाद झाल्यामुळे हा सामना गमावल्याचे त्याने मान्य केले. बाबर आणि मोहम्मद रिझवान यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केल्यानंतर पाकिस्तानचा संघ अवघ्या १९१ धावांत आटोपला.‘आम्ही चांगली सुरुवात केली. आम्ही चांगली भागीदारी केली. केवळ सर्वसाधारण खेळ करण्याचा, चांगली भागीदारी रचण्याचा आमचा प्रय्तन होता.

हे ही वाचा:

बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे

ऑपरेशन अजय : इस्रायलमधून १९७ भारतीय सुखरूप दिल्लीत!

ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत तीन कोटींची लूट!

संगीत महोत्सवातील हमासच्या नृशंस हल्ल्याची हादरवणारी दृश्ये उघड!

 

मात्र अचानक सगळेच बिघडले आणि आम्ही अपयशी ठरलो. आम्ही ज्या प्रकारे सुरुवात केली, ते आमच्यासाठी चांगले नव्हते. आमचे लक्ष्य २८०-२९० धावांचे होते. पण फलंदाजांची पडझड आम्हाला महागात पडली. आम्ही ठेवलेले धावसंख्येचे लक्ष्य पुरेसे नव्हते. नवीन चेंडूंवर आमची कामगिरी चांगली झाली नाही,’ अशा शब्दांत बाबरने पाकिस्तानच्या पराभवाचे विश्लेषण केले. तसेच, बाबरने रोहित शर्माचे कौतुक केले. त्याने चांगला खेळ दाखवला. आम्ही विकेट घेण्यात अपयशी ठरलो, असे बाबर म्हणाला.भारताने विश्वचषकातील सलग तीन सामने जिंकले आहेत. आता भारताचा पुढील सामना १९ ऑक्टोबरला बांगलादेशसोबत होणार आहे. तर, पाकिस्तानची लढत २० ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा