भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी शुभमन गिल अहमदाबादला रवाना!

डेंग्यूमुळे दोन सामन्यात गिल गैर हजर

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी शुभमन गिल अहमदाबादला रवाना!

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.सामन्याच्या तयारीसाठी भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल आज १२ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे पोहचला आहे.शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.डेंग्यूमुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात सहभाग घेता आला न्हवता.शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने त्याचे चाहते नाराज झाले होते, मात्र आता तो पूर्णपणे बरा झाला असून भारत-पाकिस्तान सामन्याच्या तयारीसाठी तो अहमदाबादला पोहचला आहे.

गिलने २०२३ मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.शुभमन गिल एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून उदयास आला. त्याने ७२.३५ च्या प्रभावी सरासरीने आणि १०५.०३ च्या स्ट्राइक रेटने एकूण १२३० धावा केल्या.२४ वर्षीय शुभमन गिल भारताच्या आशिया कप २०२३ च्या यशस्वी मोहिमेदरम्यान सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, ज्याने स्पर्धेत ३०२ धावा केल्या होत्या.गिल चांगली कामगिरी करत आहे परंतु तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा भाग असेल की नाही याची खात्री नसल्याचे बीसीसीआयच्या एका सूत्रांकडून सांगण्यात आले होते.

हे ही वाचा:

शतकवीर रोहितमुळे भारताकडून अफगाणिस्तान स्वस्तात पराभूत

भारताचा जीडीपी ६.३ टक्के राहण्याची शक्यता

“राज्याचा जीव उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी घेतला”

नांदेड रुग्णालयातील मृत्यूमागे विविध कारणे; औषधांची कमतरता हे कारण मात्र नाही!

गिलची प्रकृती ठीक आहे आणि तो आज चेन्नईहून अहमदाबादला रवाना होणार आहे.त्याची प्रकृती ठीक झाली आहे परंतु तो पाकिस्तान विरुद्ध सामन्यात आपली कामगिरी दाखवले याची खात्री नाही, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

गिल याआधीच पहिल्या दोन विश्वचषक सामन्यांना चुकला आहे, पहिला म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना आणि दुसरा म्हणजे अफगाणिस्तानविरुद्धचा सामना.अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी गिल लवकरच संघात येईल असे संकेत दिले होते.शुभमन गिलला झालेल्या डेंग्यू बाबत डॉ अमरिंदर सिंग म्हणाले की, शुभमनला झालेला डेंग्यू हा बरा होईल परंतु त्याला थोडा वेळ लागेल.डेंग्यू बराहोण्यासाठी गिलने भरपूर प्रमाणात आरोग्य पूरक आहार, फळे आणि द्रव घ्यावे लागले जेणेकरून तो लवकर बारा होईल,डॉ. अमरिंदर सिंग म्हणाले.

 

 

Exit mobile version