१५ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान भिडणार

विश्वचषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

१५ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान भिडणार

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) ट्वीट करत वेळापत्रक जाहीर केलं आहे. ५ ऑक्टोबरपासून या रोमांचक स्पर्धेला सुरुवात होणार असून सलामीचा सामना अहमदाबादमध्ये रंगणार आहे.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा १०० दिवसांनी म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. तर, भारत आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. तर, वर्ल्डकपमधील बहुचर्चित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ ऑक्टोबरला रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर विश्वचषकाचा सलामीचा आणि अंतिम सामना खेळला जाणार आहे. तर, उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत.

हे ही वाचा:

क्रिकेट सामन्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्ताच्या रक्कमेत कपात

दिल से बुरा लगता है… फेम देवराज पटेलचे अपघाती निधन; कोण आहे देवराज?

कंपासमधील ब्लेडने दर्शनावर वार नंतर दगडाने मारहाण

“माझी ड्युटी संपली…”, म्हणत वैमानिकाने दिल्लीच्या प्रवाशांना जयपूरलाच सोडलं!

विश्वचषक स्पर्धेत एकूण १० संघांमध्ये ४८ सामने खेळले जाणार आहेत. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश या देशांचे संघ या स्पर्धेसाठी आधीच पात्र झाले आहेत. उर्वरित दोन संघ या महिन्यात पात्रता स्पर्धेद्वारे निश्चित होतील. पात्रता स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिज, नेदरलँड, आयर्लंड, श्रीलंका, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

Exit mobile version