पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा यांनी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीवर टीका केली होती.विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना वेगवेगळे चेंडू दिले जातात असा आरोप हसन रझा यांनी केला होता.विशेष करून भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रझा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.या टीकेला मोहम्मद शमीने चांगलंच उत्तर दिलं आहे.गोलंदाजीवर आरोप करण्यापूर्वी हसन रझा याना थोडी तरी लाज वाटायला हवी होती, असे प्रत्युत्तर देत मोहम्मद शमी यांनी त्यांच्या वक्तव्यावर निंदा व्यक्त केली आहे.
हसन रझा यांनी काही दिवसापूर्वी एका पाकिस्तानी चॅनलवर बोलताना असा आरोप केला होता की, आयसीसी आणि बीसीसीआयकडून भारताला बॉलचा वेगळा सेट दिला जात आहे, त्यामुळे त्यांना २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्यात इतरांच्या चेंडूपेक्षा त्यांच्या चेंडूंमध्ये जास्त प्रभाव पाडण्यास मदत होत आहे.त्यामुळे याची चौकशी केली पाहिजे, असे रझा म्हणाले होते.
“सिराज आणि शमी ज्या पद्धतीने चेंडू स्विंग करत होते, त्यावरून असे वाटत होते की, आयसीसी किंवा बीसीसीआय त्यांना दुसऱ्या डावात वेगवेगळे आणि संशयास्पद चेंडू देत आहेत. चेंडूवर तपासणी करणे आवश्यक आहे. स्विंगसाठी चेंडूवर अतिरिक्त थर देखील असू शकतो,” तो पुढे म्हणाला.
शमीने इंस्टाग्रामवर माजी पाक क्रिकेटपटूला फटकारले आणि म्हटले की, त्याला थोडी लाज वाटली पाहिजे.शमी पुढे म्हणाला की, हसन रझाला कोणाचे ऐकायचे नसेल तर त्याने महान पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी एका चॅनलला दिलेली मुलाखत लक्षपूर्वक पाहून ऐकले पाहिजे.
हे ही वाचा:
अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता श्रीकृष्णाचे व्यवस्थापन धडे
पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्यावर जीवघेणा हल्ला
ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जींना ईडीचे समन्स
तसेच शमीने इंस्टावर लिहिले की, लाज वाटली पाहिजे यार, आपल्या खेळावर लक्षकेंद्रित करा नाकी फालतू गोष्टींवर, कधी तरी दुसऱ्यांच्या यशाचा आनंद घ्या, यार हा आयसीसी वर्ल्ड कप आहे नाकी एपीके स्थानिक स्पर्धा, वसीम भाईने समजावले होते तरी सुद्धा… हाहाहाहाहाहाहाहा, आपला खेळाडू असलेला वसीम अक्रम यांच्यावर विश्वास नाही आहे, तुम्ही तर स्वतःची स्तुती करण्यात व्यस्त आहात.. व्हा, असे शमीने इंस्टाग्रामवर लिहिले.
विशेष म्हणजे, हसन रझा यांनी केलेल्या टिप्पणीला पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी नाव न घेता फटकारले व म्हणाले, मला या लोकांकडे ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. गंमत वाटते. कारण त्यांचे मन स्थिर नसते. अशा विधानांमुळे त्यांची जगाने निंदा केली आणि आम्हालाही त्यांच्यासोबत खाली नेले, असे अक्रम एका मुलाखती दरम्यान म्हणाले.