23 C
Mumbai
Sunday, January 12, 2025
घरविशेषविश्वविजेती निखत झरीन गोपीचंदच्या पावलावर पाऊल टाकणार, उघडणार बॉक्सिंग अकादमी

विश्वविजेती निखत झरीन गोपीचंदच्या पावलावर पाऊल टाकणार, उघडणार बॉक्सिंग अकादमी

जागतिक स्पर्धेत मिळविले विजेतेपद, आता तेलंगणा सरकारकडे अकादमीसाठी केली जागेची मागणी

Google News Follow

Related

बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याप्रमाणेच आपण हैदराबाद येथे एक अकादमी उभी करणार आहोत, असे मत जागतिक बॉक्सिंग स्पर्धा विजेती निखत झरीनने व्यक्त केले आहे.

जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी निखतच झरीनने अनेक प्रकारचा संघर्ष केला. पण आता तेलंगणात असलेल्या गुणवत्तेला मार्गदर्शन करण्यासाठी ती इच्छुक आहे. ती म्हणते की, योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्यात आले तर या गुणवत्तेला जागतिक स्तरावर पोहोचण्यात अजिबात अडथळे येणार नाहीत.

पुलेला गोपीचंद यांनीही प्रथम खेळाडू म्हणून आपली कर्तबगारी सिद्ध केली होती पण नंतर प्रशिक्षणाच्या क्षेत्रात उतरत सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू अशा जागतिक दर्जाच्या खेळाडूंना घडविण्यात त्यांनी स्वतःचे पुढील आयुष्य खर्ची घातले आहे. त्यासाठी हैदराबाद येथे त्यांनी एक भव्य अकादमी उभारली. त्यातून भारतीय बॅडमिंटनचा चेहरामोहरा त्यांनी बदलून टाकला.

हे ही वाचा:

नाशिकमधून उद्धव ठाकरे गटाच्या पुरुष, महिला पदाधिकारी शिवसेनेत

कॅलिफोर्नियाच्या गुरुद्वारात झाडल्या गोळ्या, २ जण जखमी

तीन-चार वर्षात देशात उभारली जातायेत ‘इतकी’ विमानतळे

परिवारवादाची तळी उचलण्याचे दिवस आता संपले प्रियांकाजी!

निखतचे वडील मोहम्मद जमील यांनी सांगितले की, राज्य सरकारकडे तिने अकादमीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. अगदी आधीपासूनच निखतच्या मनात अकादमीचे स्वप्न होते. अव्वल दर्जाची बॉक्सर होण्यासाठी काय काय संघर्ष करावा लागतो हे तिला चांगले ठाऊक आहे. त्या दिव्यातून ती गेली आहे. अर्थात, ज्या सुविधा आता आहेत त्यातूनच ती घडली आहे. मात्र येणाऱ्या पिढीला चांगल्या सुविधा मिळाल्या तर मोठ्या संख्येने खेळाडू तयार होऊ शकतील असे तिला वाटते. त्यासाठीच तिने मंत्री केटी रामा राव यांच्याशी संपर्क साधून सरकारकडून १० एकरच्या जागेसाठी अर्ज केला आहे. सरकारकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारनेही अशी अकादमी उघडण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सूत्रांनी सांगितले की, भारती. बॉक्सिंगमध्ये अनेक मुली चांगली कामगिरी करत असल्या तरी आपल्याकडे उच्च कामगिरी करण्याकरिता केंद्र नाहीत. त्यामुळे निखतने अशी अकादमी उघडून त्यात उच्च कामगिरीसाठी सुविधा उपलब्ध केल्या तर पुढच्या पिढीतील मुलींना त्या सुविधा उपयोगाच्या ठरू शकतील.

लवकरच निखतला राज्य सरकारकडून पोलिस दलात नोकरीही देण्यात येण्याची शक्यता आहे. पोलिस उपअधीक्षक म्हणून तिला जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याची प्रक्रिया आता अखेरच्या टप्प्यात आहे. राज्य सरकारने तिला हैदराबाद शहरात ६०० यार्डाची एक जागाही घरासाठी उपलब्ध करून दिली आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत निखतने आपले ५० किलो वजनी गटातील सुवर्णपदक राखले. तिने व्हिएतनामच्या एनग्युएन थी तामला ५-० असे सहज पराभूत केले. मेरी कोमने जागतिक स्पर्धेत सहा सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यामुळे तिच्यानंतर दोनवेळा जागतिक स्पर्धा जिंकणारी खेळाडू म्हणून निखतचे नाव आता इतिहासात नोंदविले जाणार आहे.

निखतनंतर लव्हलिना बोर्गोहेनने आपले पहिले जागतिक विजेतेपद नोंदविले. तिने २०१८, २०१९मध्ये दोन ब्राँझपदके जिंकली होती. ७५ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्कवर तिने ५-२ असा विजय मिळविला. नितू घंघास (४८ कि), साविती बूरा (८१ किलो) यांनीही सुवर्णपदके जिंकली. त्यामुळे भारताच्या खात्यात चार सुवर्णपदके जमा झाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा