८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रगती साजरी करण्यासाठी या दिवसाची सुरुवात झाली. १९११ साली पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला असून यावर्षी १११ वा महिला दिन साजरा होत आहे.
महिला दिनाच्या औचित्याने जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांचे हक्क, अधिकार, समाजातील स्थान, त्यांची प्रकृती, विकास, महिला सशक्तिकरण, सबलीकरण, महिलांचे प्रश्न, प्रकृतीच्या समस्या, अशा अनेक विषयांवर प्रबोधन करणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे थीम ‘शाश्वत उद्यासाठी आज लिंग समानता’ अशा प्रकारची आहे हे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ही थीम ठरवण्यात आली आहे. महिला दिनाच्या या प्रसंगी जगभरातुन महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गुगलने नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत डुडलच्या माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा:
Exit poll : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचाच डंका
तब्बल ३८ वर्षांनंतर प्रशासकाकडे मुंबई महापालिकेचा पदभार
…आणि काश्मीर फाइल्समुुळे काश्मिरी पंडितांना अश्रु अनावर
मंगळवारी संजय राऊत यांची पत्रकार परिषद; यावेळी प्रश्नोत्तरे होणार का?
आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात, “महिला दिनानिमित्त, मी आपल्या नारी शक्तीला आणि त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीला अभिवादन करतो. केंद्र सरकार आपल्या विविध योजनांद्वारे महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करत राहील आणि सन्मान आणि संधी यावर भर देईल. आर्थिक समावेशनापासून ते सामाजिक सुरक्षा, दर्जेदार आरोग्यसेवा ते गृहनिर्माण, शिक्षण ते उद्योजकतेपर्यंत, आपल्या नारी शक्तीला भारताच्या विकासाच्या प्रवासात आघाडीवर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आहेत. हे प्रयत्न आगामी काळात आणखी जोमाने सुरू राहतील. कच्छमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला मी आज संध्याकाळी 6 वाजता, संबोधित करेन ज्यामध्ये आपल्या समाजातील महिला संतांच्या योगदानावर प्रकाश टाकला जाईल. संस्कृतीच्या विविध पैलूंवर, केंद्राच्या विविध कल्याणकारी उपाययोजना आणि बरेच काही यावर लक्ष केंद्रित केले जाईल.”