जागतिक बँक भारताच्या लसीकरणाबद्दल हे म्हणाली….

जागतिक बँक भारताच्या लसीकरणाबद्दल हे म्हणाली….

जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी शनिवारी वॉशिंग्टनमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. तेव्हा मालपास यांनी भारताच्या कोविड- १९ लसीकरण मोहिमेबद्दल मंत्री सीतारामन यांचे अभिनंदन केले आणि लसी उत्पादन आणि वितरणात भारताच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेबद्दल मंत्री सीतारामन यांचे आभार मानले. मालपास यांनी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (IFC) आणि बहुपक्षीय गुंतवणूक हमी एजन्सी (MIGA) यासह सर्व जागतिक बँक समूह घटकांमध्ये भारतासाठी जागतिक बँकेच्या दृढ बांधिलकीची पुष्टी केली.

जागतिक बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘मालपास यांनी भारताच्या कोविड- १९ लसीकरण मोहिमेबद्दल मंत्री सीतारामन यांचे अभिनंदन केले. लस उत्पादन आणि वितरणात भारताच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेबद्दलही त्यांचे आभार मानले.’ मालपास यांनी हवामान बदल आणि भारताचे प्रयत्न यावरही निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात अक्षरशः कहर केला होता. दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यावरही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधक लसीची निर्यात काही काळ स्थगित करून देशातील नागरिकांच्या लसीकरणावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले होते. लसीकरण मोहिमेला वेगाने सुरुवात करून दरम्यानच्या काळात लसीकरणात भारताने अनेक ऐतिहासिक टप्पे गाठण्याचे विक्रम केले.

हे ही वाचा:

‘काँग्रेस पक्षाची अवस्था ही सर्कससारखी झाली आहे’

पवारसाहेब किती हा भाबडेपणा?

‘ब्रिटीश खासदाराच्या हत्येमागे इस्लामी दहशतवादी’

अवघ्या २९ वर्षांचा क्रिकेटपटू अवि बरोटचे झाले निधन

गेल्या महिन्यात, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी घोषणा केली होती की, भारत कोविड- १९ लसींचा पुरवठा काही काळ स्थगित केल्यानंतर पुन्हा सुरू करेल. जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक भारताने एप्रिलमध्ये कोविड- १९ लसीची निर्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर थांबवली होती. जेणेकरून देशातील संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करता येईल.

Exit mobile version