30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषनोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिला समाजाला उद्ध्वस्त करत आहेत

नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिला समाजाला उद्ध्वस्त करत आहेत

पाकिस्तानचा माजी कर्णधार सईद अन्वर याचीं मुक्ताफळे

Google News Follow

Related

महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वातंत्र्याबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार सईद अन्वर मोठ्या वादात सापडले आहेत. माजी क्रिकेटपटू ते आता समालोचकाची भूमिका बजावणाऱ्या या व्यक्तीने नोकरीव्यवसाय करणाऱ्या महिलांबदद्ल अयोग्य वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.

या व्हिडिओमध्ये सईद अन्वर घटस्फोटाच्या दरात वाढ झाल्याबद्दल खेद व्यक्त करताना दिसत आहेत. महिलांचे घराबाहेर काम करणे आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे हे यासाठी जबाबदार असल्याचे तो सांगताना दिसत आहे. ‘मी जगभर प्रवास केला आहे. मी नुकताच ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधून परतलो. मुले त्रस्त आहेत आणि कुटुंबे भयानक स्थितीत आहेत. पती-पत्नी भांडत आहेत. परिस्थिती इतकी वाईट आहे की, त्यांना त्यांच्या बायकांना पैशांसाठी काम करायला लावावे लागते,’ असे सईद अन्वर म्हणताना दिसत आहेत.

सईद अन्वर यांनी अनेक देशांतील लोकांसोबतच्या अनुभवाचे वर्णन केले. ‘न्यूझीलंडचा राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार, केन विल्यमसनने मला फोन करून विचारले होते. आपला समाज यातून कसा बरा होऊ शकेल? जेव्हापासून आपल्या महिलांनी बाहेर काम करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून आपली संस्कृती नष्ट झाली आहे,’ असे त्याने सांगितले.

अन्वरच्या या वक्तव्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचे विचार कालबाह्य आणि हानीकारक असल्याची टीका केली असून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व आणि काम करण्याची क्षमता यावर जोर दिला आहे.

‘पाकिस्तानमध्ये महिलांनी काम करण्यास सुरुवात केल्यापासून घटस्फोटाचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत ३० टक्क्यांनी वाढले आहे,’ असेही सईद अन्वर म्हणाले. ‘बायको म्हणते, तू नरकात जा, मी स्वत: कमवू शकते. मी स्वतः घर चालवू शकते. हा संपूर्ण गेम प्लॅन आहे. जोपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला हा गेम प्लॅन समजणार नाही,’ असेही ते म्हणत आहेत.

काही नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूला अशा प्रतिक्रिया दिल्याबद्दल फटकारले. ‘त्यांची कालबाह्य मानसिकता ही प्रगती आणि समानतेला कलंक आहे. २०२४मध्येदेखील कोणीतरी अजूनही अशा पुरातन समजुतींना चिकटून आहे, हे भयंकर आहे. अशा व्यक्ती समाजातील स्त्रियांच्या योगदानाला अपमानित करत आहेत. महिलांनी काम करणे हा गेम प्लॅन नसून ती सबलीकरण आणि आर्थिक गरज आहे,’ असे एका यूजरने लिहिले आहे.

दुसऱ्या युजरने लिहिले, ‘हा माणूस म्हणत आहे की तुम्ही स्त्रियांना गुलाम बनवा, त्यांचे पंख छाटून टाका, जेणेकरून ते पाळीव प्राण्यांप्रमाणे पुरुषांची सेवा करू शकतील आणि त्यांचा सल्ला घेणारे हे लोक कोण आहेत?’

हे ही वाचा:

शिंदेंच्या बॅगांची तपासणी झाली आता ठाकरेंच्या फार्म हाऊसची होऊ द्या!

चिमुकल्या मोदी, योगींची हवा, पंतप्रधान मोदींनी भाषण थांबवले

केजरीवाल यांच्या गळ्याभोवती नवा फास आवळू लागला!

भारतीय वायूसेनेचे ‘भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल’ अवतरले!

सईद अन्वर हे सन १९८९ ते २००३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून खेळले. त्यांनी प्रामुख्याने कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारांत सलामीवीर म्हणून फलंदाजी केली. आपल्या लहान मुलीला दीर्घ आजाराने गमावल्यानंतर त्यांनी क्रिकेट खेळणे बंद केले आणि एक धार्मिक व्यक्ती झाले. सन २००३च्या विश्वचषकासाठी त्यांचे पुन्हा आगमन झाले, परंतु त्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा