छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात कारखान्यातून बाहेर पडले टाटा सफारीचे १० हजारावे मॉडेल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात कारखान्यातून बाहेर पडले टाटा सफारीचे १० हजारावे मॉडेल

टाटा मोटर्सच्या कारखान्यातून एक गाडी बाहेर पडत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ खूप खास आहे कारण, ही गाडी कारखान्यातून बाहेर पडत असताना कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला.

सोशल मिडीयावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ टाटा मोटर्सच्या कारखान्यातील असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडीओनुसार टाटा सफारी या गाडीचे १० हजारावे मॉडेल तयार करुन कारखान्याबाहेर काढण्यात आले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. “प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय…” अशी गारद एका महिलेने दिल्याचे या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. ही गारद देताना सर्वजण मोठ्या उत्साहात जय असे एक सुरात आवाज देतात. त्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटामध्ये गाडी असेम्बली लेनवरुन बाहेर पडताना दिसते.

“टाटा मोटर्सच्या संस्कृतीचे अजून एक उत्तम उदाहरण… टाटा कंपनीच्या टाटा सफारी या मॉडेलची १० हजारावी गाडी कारखान्याबाहेर पडताना छत्रपती शिवाजी महाराज यांची गारद देत असेम्बली लाइनवरुन बाहेर काढण्यात आली,” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या’

‘परमबीर सिंह यांचा स्वतःच्या पोलीस दलावर विश्वास नाही’ सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

भर बर्फात बॉलीवूड गाण्यावर सैन्याचे कदमताल

विवो आयपीएल आता टाटा आयपीएल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काहींच्या मते हा व्हिडीओ पुण्यातील चाकण इथला आहे. हा व्हिडीओ कुठलाही असला तरी कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि महाराजांच्या नावाने दिलेल्या घोषणा पाहून अभिमान वाटत असल्याच्या प्रतिक्रिया या व्हिडीओला अनेकांनी सोशल मीडियावर दिल्या आहेत.

Exit mobile version