‘राम मंदिर बांधणाऱ्यांचा सन्मान झाला, ताजमहाल बांधणाऱ्यांचे हात कापले गेले’

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य 

‘राम मंदिर बांधणाऱ्यांचा सन्मान झाला, ताजमहाल बांधणाऱ्यांचे हात कापले गेले’

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत ‘वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या’ (WHEF) वार्षिक परिषदेला संबोधित करताना भाजप सरकारकडून कामगारांचा करण्यात आलेल्या सन्मानाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांचा गौरव केला. तर ताजमहाल बांधणाऱ्या कामगारांचे हात कापले गेले होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “२२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांचा कसा सन्मान करत होते ते तुम्ही पाहिले असेल. एकीकडे पंतप्रधान त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत होते, तर दुसरीकडे याआधीची परिस्थिती अशी होती की ताजमहाल बांधणाऱ्या कामगारांचे हात कापण्यात आले होते. इतिहासात कापड उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचे हातही कापले गेले, त्यामुळे संपूर्ण परंपरा आणि वारसा नष्ट झाला, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले.

हे ही वाचा :

बांगलादेशांत काली माता मंदिराची तोडफोड

हिजाब न घालता गाणे गायले, इराणकडून गायिकेला अटक!

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयक विलंबाने !

मतलबी वारे सुस्साट… काँग्रेस फुटणार, मविआ बुडणार?

आज भारत आपल्या श्रमशक्तीचा आदर करतो आणि त्यांना सर्व प्रकारची सुरक्षा प्रदान करतो. दुसरीकडे, असे शासकही होते ज्यांनी मजुरांचे हात कापले आणि चांगले कापड बनवणाऱ्या विणकरांचा वारसा नष्ट केला, परंपरा नष्ट केली. दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत कौतुक केले. २०१४ सालापासून आतापर्यंतच्या भारताच्या प्रगतीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.

मोदींनी काँग्रेसलाधू धू धुतले !संविधान बदलाचे नरेटिव्हच पुसले | Mahesh Vichare | Narendra Modi |

Exit mobile version