25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषआम्ही तुम्हाला झोपू देणार नाही, पॅलेस्टाईन समर्थकांनी भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदारांना...

आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही, पॅलेस्टाईन समर्थकांनी भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदारांना केले लक्ष!

पॅलेस्टाईन समर्थकांनी ठाणेदारांच्या घराबाहेर घोषणाबाजी देत केली निदर्शने

Google News Follow

Related

इस्रायलविरोधी निदर्शकांच्या एका गटाने आठवड्याच्या शेवटी अमेरिकेत भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांच्या विरोधात निदर्शने केली. या आंदोलनात सहभागी असलेले लोक ठाणेदार यांच्या घराबाहेर येऊन कारचे हॉर्न वाजवत होते. गाझामधील पॅलेस्टिनींच्या मृत्यूंबाबत ठाणेदार यांचे मौन आणि इस्रायल-हमास युद्धावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर श्री ठाणेदार यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शविला होता.

श्री ठाणेदार यांनी सोमवारी ट्विट करत पोस्टमध्ये लिहिले की, पहाटे ३ वाजता आंदोलक माझ्या घराबाहेर जमले.पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील समाविष्ट आहे ज्यामध्ये त्याच्या घराबाहेर रस्त्यावर कार उभ्या असलेल्या दिसल्या आणि एक व्यक्ती कापडासारखी वस्तू हलवत आहे तर इतर काही घोषणा देत आहेत. व्हिडिओमध्ये एक आंदोलक ‘गाझा बॉम्बस्फोटात तुम्ही सहभागी आहात’ असे म्हणताना दिसत आहे. तुमचे मौन म्हणजे हिंसा आहे. तुमचे मौन घृणास्पद आहे आणि आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही, असे व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.एक आंदोलक म्हणत आहे की, याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल.

हे ही वाचा:

इंडिगोचे उड्डाण, जगातील टॉप १० मध्ये!

ज्ञानवापी मशीद प्रकरणात मुस्लिम पक्षाला दणका; याचिका फेटाळल्या

 मध्य प्रदेश विधानसभेतील नेहरुंचे चित्र काढून डॉ. आंबेडकरांचे चित्र लावले

 राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अडवाणी, मुरली मनोहर जोशींना रितसर निमंत्रण

दरम्यान, भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांनी त्यांच्या मोहिमेच्या वेबसाइटवर इस्रायलला आपला भक्कम पाठिंबा व्यक्त केला आहे, ज्यात “इस्राएलच्या अस्तित्वाच्या आणि भरभराटीच्या हक्काचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे.ठाणेदार यांनी हमासला एक रानटी(जंगली) दहशतवादी संघटना म्हणून संबोधले आणि ते संपवण्याची गरज असल्याचे सांगितले. ठाणेदार यांनी नुकतीच हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन यांच्यासाठी काँग्रेसच्या कॉकसची स्थापना केली होती.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा