पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाविरोधात अपमानास्पद विधानांमुळे निर्माण झालेला भारत आणि मालदीव यांच्यातील वाद अधिक गडद होताना दिसत आहे.देशातील अनेक सेलेब्रेटींनी मालदीवचा निषेध करत चलो लक्षद्विपचा नारा दिला. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत.इतर कोणत्याही देशाच्या व्यक्तीने पंतप्रधानांविरोधात अशी टिप्पणी केली तर ते आम्ही स्वीकारणार नाही.मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आपण पंतप्रधानपदाचा आदर केला पाहिजे.आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशाबाहेरील कोणतीही गोष्ट स्वीकारणार नाही. पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इस्रायलपासून बांगलादेशपर्यंतच्या देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे.
हे ही वाचा:
लाइटहाऊस’ प्रकल्प करेल दीपस्तंभाप्रमाणे काम
राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड होणार
अयोध्येत एकाचवेळी १२००चपात्या बनवणारी मशीन पोहोचली!
मालदीवची भारतविरोधी ज्योत मालवली! घेतली नरमाईची भूमिका
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा मालदीववर मोठा परिणाम होताना दिसत आहे. सर्वप्रथम, सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली, त्यानंतर आघाडीच्या भारतीय ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवसाठी फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग रद्द केले आहेत.
‘राममंदिर हा श्रद्धेचा मुद्दा’
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी राम मंदिराच्या मुद्यावर आपले मत मांडले.ते म्हणाले की, राम मंदिराचा मुद्दा श्रद्धेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. यासह त्यांनी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरही स्पष्टीकरण देत त्यांचे वक्तव्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे सांगितले.