कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत महिला संघाची सुवर्णकमाई!

कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत महिला संघाची सुवर्णकमाई!

कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत भारताने अव्वल कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. मनू भाकर, रिदम सांगवान आणि नाम्या कपूर यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने जागतिक नेमबाजी स्पर्धेतील २५ मीटर पिस्तुलच्या महिला सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या त्रिकुटाने बुधवारी ही कामगिरी करत कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेतील भारताचे वर्चस्व कायम राखले. भारतीय संघाने अमेरिकेवर १६- ४ असा विजय मिळवला.

रॅपिड फायरच्या आठव्या मालिकेला सुरुवात होण्याआधी मनू, रिदम आणि नाम्या यांनी १०- ४ अशी आघाडी घेतली. नंतर १६- ४ असा विजय मिळवला. मंगळवारी पात्रतेच्या पहिल्या फेरीत भारतीय संघाने एकूण ८७८ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला, तर फ्रान्सच्या संघाने दुसरा क्रमांक पटकावला. दुसऱ्या फेरीत भारताने ४४६ तर ४३७ गुणांसह अमेरिकेने अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेतील मनूचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. तसेच एका कांस्य पदकाचीही कमाई तिने केली आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानला मिळणारी मदत तातडीने थांबवा!

मुस्लिम शिक्षकांना वेगळे करून काश्मीरात हिंदू, शीख शिक्षकांची हत्या

देशभर सुरु आदिशक्तीचा जागर

…आणि असा घातला त्याने मित्रालाच गंडा

आदर्श सिंगने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात भारताला रौप्य पदक जिंकून दिले. सहा नेमबाजांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या हेन्री टर्नर लेव्हेरेटकडून त्याचा पराभव झाला. तसेच बख्तयारुद्दीन, शार्दुल विहान आणि व्हिवान कपूर यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष ट्रॅप संघाने रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताने ५२५ पैकी ४७३ गुण मिळवून सात संघांपैकी दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात इटलीकडून ४- ६ अशा फरकाने त्यांनी पराभव पत्करला.

Exit mobile version