बीसीसीआयने महिला आशिया चषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा १९ जुलैपासून सुरू होत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात १५ खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे. आतापर्यंत भारताने ७ वेळा आशिया चषक जिंकला आहे. अशा तऱ्हेने टीम इंडिया आठव्यांदा आशिया चषक आपल्या नावावर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आशिया चषकात भारतीय संघाची धुरा अनुभवी हरमनप्रीत कौरच्या हातात असेल. याशिवाय दक्षिण आफ्रिका मालिकेत उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या स्मृती मंधानाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, सजना सजीवन.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अ गटात स्थान देण्यात आले आहे. या गटात भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान १९ जुलै रोजी आमनेसामने येणार आहेत. यानंतर २१ जुलै रोजी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीचे संघ आमनेसामने येणार आहेत. तर भारत आणि नेपाळ यांच्यात २३ जुलै रोजी सामना रंगणार आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहे.
हेही वाचा :
फॉर फ्युचर इंडिया संस्थेचे ३०० वे स्वच्छता अभियान
दिल्लीत कोचिंग क्लासमध्ये कुराण, कलमाचे ‘शिक्षण’ देत असल्याची तक्रार
मुंबईच्या तलावात वरुणराजा प्रसन्न, पाणीपातळीत ४ टक्क्यांची वाढ
मुंबईच्या तलावात वरुणराजा प्रसन्न, पाणीपातळीत ४ टक्क्यांची वाढ
पहिला महिला आशिया चषक २००४ मध्ये आयोजित करण्यात आला होता. आतापर्यंत ८ वेळा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये भारतीय संघाने ७ वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर बांगलादेश १ वेळा चॅम्पियन बनला आहे. भारत आणि बांगलादेश वगळता इतर संघांना ट्रॉफी जिंकण्यात यश आलेले नाही.