महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा, त्यांचे सक्षमीकरण व्हावे या हेतूने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण राज्यात राबवण्यात येणार असल्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याबरोबरच काही पर्यटन स्थळांवर महिला बाईक-टॅक्सी सेवा सुरू करण्यालाही यावेळी मान्यता देण्यात आली.
पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र पर्य़टन विकास महामंडळ यांच्यामार्फत सर्व संबंधित विभागांच्या विविध योजनांशी समन्वय साधून हे धोरण राबविण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष तयार करण्यात येणार आहे.
या धोरणात महिला उद्योगजगता विकास, महिलांसाठी पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांचा सुरक्षततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज्ड उत्पादने, सवलती व प्रवास आणि पर्यटन विकास या पंचसूत्रीचा अवलंब करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
साहीलला केलेल्या निर्घृण कृत्याचा जराही पश्चात्ताप नाही
पर्यटन व्यवसायात आता होणार महिलांचे सक्षमीकरण
राज्यात शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू
राज्यात शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू
महिला पर्यटन क्षेत्रात व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी तसेच महिला पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा लाभ घेता यावा, या उद्देशाने विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यदलाची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या दहा पर्यटन व्यवसायांना सहाय्य करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या १ ते ८ मार्च या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट्स, युनिट्समध्ये महिला पर्यटकांना ऑनलाइन बुकिंगमध्ये ५० टक्के सूट देण्यात येईल. वर्षभरात एकूण ३० दिवस महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट्समध्ये ५० टक्के सूट देण्यात येणार आहे.