30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषस्त्रियाही घेऊ शकणार सैन्यदलाचे प्रशिक्षण! वाचा...

स्त्रियाही घेऊ शकणार सैन्यदलाचे प्रशिक्षण! वाचा…

Google News Follow

Related

भारतीय सैन्यदलांत जाण्याची इच्छा असणाऱ्या मुलींसाठी आता सैन्याची दारे खुली झाली आहेत. सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निकालामुळे अनेक मुलींसाठी आता सैन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पाच सप्टेंबर रोजी होणारी एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा आता मुलींनाही देता येणार आहे. सर्वोच्च न्यायालायने आज, बुधवारी याबाबतचा निर्णय दिला आहे. महिलांना दिल्या जाणाऱ्या संधीचा विरोध केल्यामुळे कोर्टाने भारतीय सेनादलाला फटकारले आहे. त्यासोबतच तुमचा दृष्टीकोन बदला, असा सल्लाही दिला. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने बुधवारी हा महत्वाचा निर्णय दिला. एनडीएमध्ये महिलांना संधी देण्यात यावी, अशी कुश कालरा यांनी याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांची पळापळ सुरूच

दादरच्या कोहिनूरमध्ये करता येणार वाहनांचे चार्जिंग

तालिबानचे ‘उदार’ धोरण एका दिवसात बंद

काबुल विमानतळाची भिंत नवी बर्लिनची भिंत?

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी परीक्षेसाठी अर्ज मागविले होते. ५ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. एन. डी. एची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इ. ११वी व १२ वीचा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपर मध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांची नंतर मुलाखत घेतली जाते.

एन. डी. ए. मध्ये दाखल होतांना उमेदवार १२ वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करणारा विद्यार्थी १२ वीत शिकणारा असावा अथवा १२ वी उत्तीर्ण असावा. एन.डी.ए. च्या सैन्य दलाच्या शाखेसाठी उमेदवार १२ वी च्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा त्याबरोबरच हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवारने १२ वी ला गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेतलेले असावे.

एन. डी. ए. मध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय- साडेसोळा ते साडेएकोणवीस दरम्यान असावे. एन. डी. एमध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा