31 C
Mumbai
Friday, November 8, 2024
घरविशेषपुढील वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार

पुढील वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार

Google News Follow

Related

महिला आयपीएल स्पर्धा आता लवकरच सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने यासाठी दुजोरा दिला असून पुढील वर्षी महिला आयपीएलचे आयोजन कऱण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती शुक्रवारी मुंबईत झालेल्या आयपीएलच्या गवर्निंग काउंसिल बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०२३ पासून सहा महिला संघाची आयपीएल स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, “महिला आयपीएलला एजीएमद्वारे परवानगी मिळणे बाकी आहे. मात्र, पुढील वर्षापर्यंत महिलांची आयपीएल स्पर्धा सुरू होईल,” अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दरम्यान मागील काही वर्षांपासून बीसीसीआय महिला आयपीएल स्पर्धा भरवण्याची तयारी करत होते. मात्र, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांनी महिला लीग टी २० स्पर्धा करण्याचे आयोजन केल्यानंतर बीसीसीआयवर दबाव निर्माण झाला होता.

सुरुवातीला महिला आयपीएलमध्ये पाच ते सहा संघाचा समावेश कऱण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुरुष आयपीएलमधील सध्याच्या दहा संघांच्या मालकांना महिला संघ खरेदी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’

आजपासून आयपीएलचा रणसंग्राम; चेन्नई, कोलकाता आमनेसामने

उत्तर प्रदेशानंतर आता दापोलीत चालणार बुलडोझर?

मुख्यमंत्री योगींच्या पहिल्याच बैठकीत मोठी घोषणा!

सध्याच्या महिला टी २० चॅलेंजरमध्ये ट्रेलब्लेजर्स, सुपरनोवाज आणि व्हेलोसिटी हे संघ खेळतात. सुपरनोवाज संघाने २०१८ आणि २०१९ मध्ये विजेतेपद पटाकवले होते. तर, २०२० साली ट्रेलब्लेजर्स संघ पहिल्यांदा विजेता बनला होता. २०२१ मध्ये कोरोनामुळे महिली टी २० चॅलेंजरचे आयोजन करण्यात आले नव्हते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा