सुमारे दीड हजार महिलांच्या जमावाच्या दबावापुढे मणिपूरमधील १२ बंडखोरांना सोडून देण्याची वेळ भारतीय लष्करावर आली. मात्र आताही मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी भारतीय लष्करातर्फे प्रयत्न केले जात असताना त्यात महिलांचा अडथळा येऊ लागला आहे. त्यामुळे त्यांनी आता ‘मणिपूरला मदत करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा,’ अशी आर्त हाक दिली आहे.
मणिपूरमधील महिला कार्यकर्त्या त्यांच्या कार्यात अडथळे आणत असून शांतता पुनर्स्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप करत आहेत, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. ‘मणिपूरमधील महिला कार्यकर्ते जाणूनबुजून मार्ग रोखत आहेत आणि सुरक्षा दलांच्या मोहिमांमध्ये हस्तक्षेप करत आहेत. सुरक्षा दले मणिपूरच्या जीवितांचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असताना असा अवाजवी हस्तक्षेप हानिकारक आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता प्रस्थापित करण्याच्या आमच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा. मणिपूरला मदत करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे,’ असे ट्वीट भारतीय लष्कराच्या स्पीयर कॉर्प्सने केले आहे.
हे ही वाचा:
दिल से बुरा लगता है… फेम देवराज पटेलचे अपघाती निधन; कोण आहे देवराज?
१५ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान भिडणार
अनधिकृत शाखा तोडल्यामुळे ठाकरे गटाचा थयथयाट
क्रिकेट सामन्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्ताच्या रक्कमेत कपात
मणिपूरच्या इथम गावात सुरक्षा दलांना कांगलेई यावोल कन्ना लुप (केवायकेएल) या बंडखोर गटाच्या १२ कार्यकर्त्यांना सोडण्यास भाग पाडल्यानंतर अवघ्या काही तासांतच हे ट्वीट आले आहे. महिला आणि स्थानिक नेत्याच्या नेतृत्वाखाली सुमारे १५०० जणांच्या जमावाने लष्कराच्या तळाला वेढा घातला होता. लष्कराने मोहीम सुरू ठेवण्यासाठी जमावाला वारंवार आवाहन करूनही त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर रक्तपात टाळण्यासाठी या सर्व १२ बंडखोरांची मुक्तता करणे लष्कराला भाग पडले होते. यामध्ये सन २०१५मध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल मोइरांगथेम तांबा याचाही समावेश होता. या हल्ल्यात १८ सैनिक मृत्युमुखी पडले होते.