जय श्रीराम : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पोटी येऊदे ‘राम’

उत्तर प्रदेशमधील गरोदर महिलांनी व्यक्त केली डॉक्टरांना विनंती

जय श्रीराम : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पोटी येऊदे ‘राम’

अयोध्येत २२ जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशमधील काही महिला मात्र इतक्या उत्साही आहेत की, त्यांनी या शुभमुहूर्ताला आपल्या पोटी ‘राम’ जन्माला यावा अशी विनंती केली आहे. उत्तर प्रदेशच्या सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयातील गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना विनंती केली आहे की, त्यांच्या मुलाचा जन्म २२ जानेवारीला व्हावा.

जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या अध्यक्षा डॉ. सीमा द्विवेदी सांगतात की,  एका लेबर रूममध्ये साधारण १४ ते १५ प्रसुती होतात. पण यावेळी या महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा जन्म २२ जानेवारीला व्हावा, अशी विनंती केली आहे.

ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी होते त्यांच्याबद्दल काही सांगता येत नाही, पण ज्यांना ऑपरेशन करायचे आहे त्यांच्यापैकी अनेकांना समजावून सांगण्यात आले आहे की, तारीख पुढे-मागे असू शकते. साधारणत: एका दिवसात १४ ते १५ शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु २२ जानेवारीला ३० ऑपरेशनची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

यूपी सरकारी रुग्णालयात ३० शस्त्रक्रियांची व्यवस्था

त्याचवेळी लेबर रूममध्ये उपस्थित गरोदर स्त्रिया सांगतात की, रामलल्ला आमच्या घरीही यावे, अशी आमची इच्छा आहे. राम मंदिराची १०० वर्षांपासून वाट पाहिली जात आहे. आता आम्हाला या शुभ दिवशीच आमच्या मुलाचा जन्म पाहिजे आहे. महिलांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, आम्ही रामाला विचारतो की, रामासारखे रूप कोणाकडेही नाही आणि त्या दिवशी मूल आमच्या घरी येईल ही नशिबाची गोष्ट असेल.

हेही वाचा :

रामायणाचा संदर्भ देऊन उलगडले भारताच्या उत्थानाचे सार!

गोळीबारात कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा मृत्यू

भव्य राम मंदिरातील प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट

२२ जानेवारीला रामलला भव्य मंदिरात विराजमान होतील

२२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. राम मंदिरात मूर्ती स्थापनेची वेळ १२.२९ मिनिटे ८ सेकंद ते १२.३० मिनिटे ३२ सेकंद असणार आहे. प्राणप्रतिष्ठेची वेळ केवळ ८४ सेकंदांची असणार आहे.

Exit mobile version