कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लादण्यात आलेले लॉकडाऊनचे निर्बंध सोमवारपासून उठवण्यात येणार आहेत. अनलॉकिंगसाठी राज्यातील जिल्ह्यांची पाच भागात विभागणी करण्यात आली आहे. रुग्णसंख्या आणि बेडसच्या उपलब्धतेनुसार या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू असतील. मुंबई ही दुसऱ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये येत असून सोमवारपासून त्याप्रमाणे शहरातील निर्बंध शिथील होतील. यामध्ये महिलांना पुन्हा एकदा लोकल प्रवासाची मुभा मिळणार आहे.
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवास करता येत होता. मात्र, आता महिलावर्गाला लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा मिळाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय, मुंबईतील मल्टिप्लेक्स, मॉलही ५० टक्के क्षमतेने सुरु केले जाणार आहेत.
हे ही वाचा:
राज्याचा प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो
‘आम्ही भजन करण्यासाठी पक्ष चालवत नाही’
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी अनलॉकबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर काल ४ जूनला मध्यरात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.