मुख्यमंत्रीजी, पेन्शन नाही, निदान आत्महत्या तरी करू द्या!

मुख्यमंत्रीजी, पेन्शन नाही, निदान आत्महत्या तरी करू द्या!

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील इंदगावच्या ६५ वर्षीय अंजनी चाबके यांनी चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. राज्यामध्ये या अशा पद्धतीने आत्महत्येची परवानगी मागण्यात येत आहे ही दुर्दैवाची बाब आहे.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील इंदगाव च्या ६५ वर्षीय अंजनी चाबके यांचे पती कोंडाजी चाबके १७ डिसेंबर ७८ला जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत जव्हार पंचायत समिती येथे शासकीय सेवेत रुजू झाले. १९७८ ते २००७ पर्यंत ते शासकीय सेवेत त्यांनी काम केले त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदावर होते. २००७ ला ते निवृत्त झाले. त्यांना पेन्शन मिळणे अपेक्षित असताना त्यांना शासनाकडून पेन्शन मिळाली नाही.

अंजनी ताई यांचे पती कोंडाजी चाबके यांना शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पेन्शन देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येला परवानगी मागितली आहे. जर १ नोव्हेंबरपर्यंत आपण तोडगा काढला नाही तर मी आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्मरण पत्राव्दारे कळविले आहे.

हे ही वाचा:

विना हेल्मेट प्रवास करताय? हजार रुपये दंड भरा

माझ्या जीवाला नवाब मलिकांपासून धोका…मोहित कंबोज यांची तक्रार

पंतप्रधान मोदी झाले शिवतांडव स्तोत्रात तल्लीन

पंतप्रधान मोदींनी दिले पोप फ्रान्सिस यांना ‘हे’ निमंत्रण

 

२०१४ मध्ये अंजनी ताईंच्या पतीची तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होत असताना १४ ऑगस्ट २०१४  मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने पेन्शन मिळण्यासाठी अनेक पत्रव्यवहार केले. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. अखेर त्यांनी २२ सप्टेंबर २०२१ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्याकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून काहीही उत्तर आलं नसल्याने त्यांनी परत २४ ऑक्टोबर २०२१ स्मरण पत्र पाठवून १ नोव्हेंबरपर्यंत मला न्याय द्या, नाहीतर त्याच दिवशी मला आत्महत्या करायला परवानगी द्या, अशी मागणी आता मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

Exit mobile version