27 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
घरविशेष७५ वर्षांत प्रथमच एसटीचे सारथ्य महिलेकडे

७५ वर्षांत प्रथमच एसटीचे सारथ्य महिलेकडे

माधवी साळवे (३४) या एसटीच्या पहिल्या महिला चालक ठरल्या

Google News Follow

Related

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसचे अर्थातच आपल्या लाडक्या एसटीचे सारथ्य गेल्या ७५ वर्षांत प्रथमच महिलांनी केले. पुणे आणि नाशिकमध्ये गुरुवारी महिला चालकांनी एसटी चालवली. सिन्नरहून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसह प्रवाशांना नाशिकला नेणाऱ्या माधवी साळवे (३४) या एसटीच्या पहिल्या महिला चालक ठरल्या आहेत.

 

गुरुवारी जेव्हा त्यांनी एसटीचे सारथ्य केले, तेव्हा त्या खूप आनंदित होत्या. ‘प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे नेणे ही मोठी जबाबदारी आहे. मी लहानपणापासूनच या बस चालवण्याचे स्वप्न पाहात होते. मी लहान वयात ऑटोमोबाईलचे शिक्षण घेतले होते. माझे वडील मेकॅनिक आहेत आणि त्यांनी मला वाहनांबद्दल सर्व काही शिकवले. दुचाकीपासून ते गाडी, टेम्पो आणि बसपर्यंत मला सर्व प्रकारची वाहने चालवण्याची आवड आहे. खरं तर, मी नाशिकमध्ये दोन महिने शहरांतर्गत बस चालवली होती आणि पुण्यात बस चालवण्याचे प्रशिक्षणही घेतले होते. अलीकडे मला इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रशिक्षणही मिळाले आहे. या नवीन युगाच्या बसेस आहेत, ज्या मी नजीकच्या भविष्यात दीर्घकाळ चालविणार आहे,’ अशी प्रतिक्रिया साळवे यांनी दिली.

 

राज्य बस महामंडळासाठी चालक-सह-कंडक्टर म्हणून तब्बल २८ महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून जड वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या महिला चालकांना नंतर तीन महिन्यांसाठी एसटी बसचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना सहभागी करून घेण्यात आले. मात्र त्यांच्याकडे परवाना नव्हता. त्यांना वर्षभर प्रशिक्षण घ्यावे लागले. अखेर त्यांची एक चाचणी घेण्यात आली. जे या चाचणीत उत्तीर्ण झाले, त्यांना कठोर प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. त्यापैकी २८ जणींना प्रत्यक्षात बस चालविण्यासाठी निवडण्यात आले. त्यापैकी काहींनी गुरुवारी बस चालवली. उर्वरित महिलांना शनिवारी आणि रविवारी ही संधी देण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

हे ही वाचा:

चार वर्षांत ४ कोटी भारतीयांना मधुमेहाची लागण!

लोकसभा निवडणुकीआधी एनडीएचे बळ वाढणार

मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये का शिजवले? आरोपी मनोजने सांगितले कारण

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत महिन्याभरात १६३ मुले पुन्हा कुटुंबीयांकडे परतली!

‘ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलती दिल्या जात असल्याने एसटीची प्रवासीसंख्या वाढली आहे. महिलांना तर सर्व प्रकारच्या एसटीमध्ये ५० टक्के सवलत दिली जाते. ही नव्या युगाची सुरुवात आहे. एसटीचे चालक हे पुरुषांची मक्तेदारी असणारे पद आहे. मात्र आता महिलाही बस चालवत आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना जिल्ह्यांतर्गत लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यासाठी दिल्या जातील,’ असे एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

 

सन २०१९मध्ये २०६ चालक थेट भरतीयोजनेतून दाखल झाले होते. त्यातील २८ जण आता बस चालवत आहेत, असे एमएसआरटीसीच्या प्रवक्त्याने सांगितले. या सर्वांना सन २०१९मध्येच भरती करण्यात आले होते. मात्र करोनामुळे प्रक्रिया लांबली. तर, काही महिला चालक यातून बाहेर पडले. या वर्षअखेरपर्यंत किमान १०० महिला चालक-कम-कंडक्टर बस चालवतील, असे सांगण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा