करायचे तरी काय? कोरोना चाचणी आधी पॉझिटिव्ह; मग निगेटिव्ह

करायचे तरी काय? कोरोना चाचणी आधी पॉझिटिव्ह; मग निगेटिव्ह

कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असताना आता चाचण्यांमधील गोंधळाचा प्रकार समोर आला आहे. कल्याणच्या रहिवासी असलेल्या एका महिलेने न्यायालयाच्या महत्त्वाच्या कामासाठी बेळगावला जाण्यासाठी २८ ऑगस्टचे रेल्वे आरक्षण केले. २५ ऑगस्टला त्यांनी कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या केंद्रात त्यांनी चाचणी केली.

या चाचणीचा अहवाल २७ ऑगस्टला पॉझिटिव्ह आला. मात्र ४८ तासांच्या आत खासगी लॅबमध्ये चाचणी केली असता तिचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे आता चाचण्यांच्या अहवालाच्या गोंधळाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

कल्याणच्या रहिवासी असलेल्या ५६ वर्षीय सुहासिनी मांजरेकर यांना रेल्वेप्रवास करायचा असल्याने त्यांनी महापालिकेच्या केंद्रात चाचणी केली दोन दिवसांनी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. माझ्यासोबत माझा मुलगाही राहतो. त्याला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने आम्ही २७ तारखेला नामांकित खासगी लॅबमध्ये चाचणी केली असता तिचा अहवाल २४ तासांत निगेटिव्ह आला. महापालिकेतून पॉझिटिव्ह अहवाल दिल्यावर वारंवार खासगी रुग्णालय किंवा कोरोना केंद्रात भरती होण्यासाठी फोन येत होते, असे सुहासिनी मांजरेकर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

टेस्लाची ‘ही’ चार मॉडेल्स भारतात

काश्मीरही काफ़िरांपासून ‘मुक्त’ करा

‘हे तुमच्यासाठी…’ खास व्यक्तीसाठी रोनाल्डोने लिहिली भावनिक पोस्ट

२५ भारतीय आयएसआयएसमध्ये सामील

कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. केवळ प्रवास करायचा असल्याने कोरोना चाचणी केली, असे मांजरेकर यांनी सांगूनही महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात भरती होण्यासाठी दबाव आणला. २८ ऑगस्टला महापालिकेचे दोन कर्मचारी रुग्णालयात नेण्यासाठी घरी आले. तेव्हा खासगी लॅबमधील निगेटिव्ह अहवाल दाखवून रुग्णालयात येण्यास ठामपणे नकार दिल्यावर ते कर्मचारी परत गेले, असेही त्यांनी सांगितले.

लक्षणे नसताना गृहविलागीकरणामध्ये राहावे, अशा सूचना पूर्वी देण्यात आल्या आहेत. मग आता रुग्णालयाची सक्ती का, महापालिकेच्या यंत्रणेवर विश्वास कसा ठेवायचा, आर्थिक स्थिती असल्यामुळे खासगी लॅबमध्ये चाचणी केली. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचे, सरकार, महापालिकेच्या सदोष यंत्रणेमुळे कल्याण- बेळगाव जाता- येता तिकीट रद्द करून दुसऱ्या दिवशी तात्काळ तिकीट काढून बेळगाव गाठावे लागले. या नुकसानीचे पैसे कोण देणार, असे अनेक प्रश्न सुहासिनी मांजरेकर यांनी उपस्थित केले आहेत.

Exit mobile version