…आणि तिने बसचे स्टेअरिंग हाती घेत वाचवले प्रवाशांचे प्राण! नेमके घडले काय?

…आणि तिने बसचे स्टेअरिंग हाती घेत वाचवले प्रवाशांचे प्राण! नेमके घडले काय?

बाका प्रसंग आला तर एक महिला कसा तो प्रसंग निभावून नेते याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. असाच एक प्रकार पुण्यात घडला. पुण्याच्या रस्त्यावर बस चालवत असताना अचानक आपत्कालीन परिस्थितीमध्ये एका महिलेने बसचे स्टेअरिंग हाती घेतले आणि सहप्रवाशांचे प्राण वाचवले. या महिलेचा बस चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

पुण्यात बस चालवत असताना अचानक एका चालकाला फीट आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालकाला फीट आल्यावर बसवरचे चालकाचे नियंत्रण सुटले असतानाच होणारा भीषण अपघात टाळला. चालकाला फीट येताच बसमधील एका महिलेने प्रसांगवधान राखत बसची सूत्र आपल्या हाती घेतली. सराईतपणे या महिलेने बस नियंत्रणात आणून प्रवाशांचे प्राण वाचवलेच शिवाय चालकालाही रुग्णालयात दाखल केले. या महिलेचा बस चालवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

महिलांचा एक ग्रुप पर्यटन करत असताना त्यांच्या ४० वर्षीय बस चालकाला अचानक फीट आली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. अशा वेळी बसमधून प्रवास करत असलेल्या योगिता सातव यांनी प्रसंगावधान राखत बसचे स्टिअरिंग हाती घेतले आणि अनियंत्रित होऊ शकणाऱ्या बसवर ताबा मिळवला आणि चालकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. जवळपास १० किलोमीटर पर्यंतचा प्रवास त्यांनी केला. वाघोली येथील योगिता सातव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे चालकासह प्रवासी महिलांचेही प्राण वाचले.

हे ही वाचा:

अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक

नागपूरच्या २० वर्षीय मालविकाने सायनाला केले पराभूत

बिकानेर एक्स्प्रेसचे चार डबे घसरले; तीन जण दगावले

दाऊदचा भाचा सोहेल कासकर पाकिस्तानमध्ये निसटला

योगिता यांना कार चालवण्याचा अनुभव होता, मात्र बस चालवण्याचा त्यांना अनुभव नव्हता. मात्र, अशा कठीण प्रसंगात त्यांनी धाडस दाखवले. चालकाला त्यांनी उपचारासाठी दाखल करून महिलांना इच्छित स्थळी पोहचवले. त्यांच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Exit mobile version